अकोला : हरियाणातील गुडगाव येथे नोकरीवर असलेल्या पतीचे दुसऱ्या महिलेवर प्रेम जडले. त्यामुळे घटस्फोटासाठी मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार ३३ वर्षीय विवाहितेने अकोट शहर पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अकोट येथील विवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ मध्ये तिचे लग्न मुंबईतील एका युवकासोबत झाले. विवाहितेला दोन अपत्ये आहेत. नोकरीच्या निमित्ताने पती हरियाणातील गुडगाव येथे आहे. घरात क्षुल्लक कारणावरून सासू-सासरे वाद घालतात. टोमणे मारून छळ करतात. सहा महिन्यांपूर्वी विवाहितेला तिच्या पतीचे कार्यालयामधील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचे कळले. त्यानंतर पतीने घटस्फोट देण्यासाठी पत्नीच्या मागे तगादा लावला. दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून घटस्फोटासाठी पतीने जोर जबरदस्ती केल्याचे पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा – वाशीम जिल्ह्यातील ९६ अंगणवाड्यांना स्वंतत्र इमारतीची प्रतिक्षा!

हेही वाचा – “संघ विचारधारेच्या पंतप्रधानांमुळे देश संकटात”, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे परखड मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१ मार्च २०२३ रोजी पतीने मुंबईवरून अकोट येथे जाण्यासाठी तिकीट काढून बळजबरीने घरातून हाकलून दिल्याचा आरोपही विवाहितेने केला. या प्रकरणी भरोसा सेलमध्ये पती-पत्नीमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न झाला. त्याला यश न आल्याने विवाहितेच्या तक्रारीनुसार पती व सासू-सासऱ्याविरुद्ध अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.