अकोला : शहरात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अंतर्गत आणखी तीन ठिकाणी छापा टाकून झाडाझडती घेण्यात आली. वेगवेगळ्या पथकांनी कारवाई करून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. यापूर्वी देखील सहकार विभागाने तीन ठिकाणी छापेमारी केली. छाप्यामध्ये प्राप्त कागदपत्रांची छाननी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.

शहरातील अकोट फैल, गड्डम प्लॉट व मलकापुरातील अंबिका नगर येथे छापा टाकल्यानंतर आज टिळक रोड, रतनलाल प्लॉट व संघवीवाडी येथे तीन पथकाद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली. या छाप्यामध्ये आक्षेपार्ह पाच नोंदवही, दोन पावती पुस्तक, सीसीटीव्ही रेकॉर्डर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. कारवाई दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सहकार विभागाचे अधिकारी पथक प्रमुख ए.एम. भाकरे, डी.डब्ल्यू शिरसाट, आर. आर. घोळके, फिरते पथक प्रमुख ज्योती मलिये, पथक सहाय्यक अनिल मनवर, एस. पी. फुके, एस. एस. आगाशे, आर. पी. भोयर, डी. डी. गोपनारायण, पी. जी. भारस्कर, एम. के. विखे, विनोद खंदारे, आर. डी. पाकदुने, आर. एम. बोंद्रे, एस. एस. वानखडे, आर. एस. इंगळे, सविता राऊत आदींचा तीन पथकात समावेश होता.

Drugs worth one crore seized in Dhule district
धुळे: अबब… एक कोटीचे अमली पदार्थ जप्त
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Protest by farmers and orchardists in front of the district magistrate office
सावंतवाडी: शेतकरी व फळ बागायतदारांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडत शक्ती प्रदर्शन
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
mcoca action, Praveen Madikhambe, Loni Kalbhor,
लोणी काळभोरमधील ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबेसह साथीदारांवर मोक्का कारवाई, पेट्रोल-डिझेल चोरीतून कोट्यवधींची संपत्ती
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
satara noise pollution marathi news
ध्वनी प्रदूषण, ‘लेसर’ वापर प्रकरणी सातारा शहरात ५८ जणांवर कारवाई
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई

हेही वाचा…अरुण गवळीच्या सुटकेबाबत आता सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार…

कारवाईमध्ये जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, पतसंस्था कर्मचारी तसेच पंच म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. छाप्यामधील जप्त दस्तऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशांची आवश्यक पुराव्यासह सहकारी संस्थेच्या कार्यालयात तक्रार दाखल करावी, तसेच ज्या नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

हेही वाचा…भोंगळ कारभार! दुपारच्या सत्रातील विमाने सकाळी किंवा रात्री…प्रवासी त्रस्त

२१ प्रकरणांमध्ये चौकशी

सहकारी संस्थेच्या कार्यालयामार्फत आतापर्यंत अवैध सावकारी अंतर्गत बळकावलेली एकूण १५०.३३ हे. आर शेतजमीन व ४९३९.५० चौ. फूट जागा तसेच एक राहता फ्लॅट संबंधितांना परत करण्यात आला आहे. आजपर्यंत १९७ प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३३ अवैध सावकारांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून २१ प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.