अकोला : गळफास घेऊन पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव पतीने केला. मात्र उत्तरीय तपासणी अहवालातून आरोपी पतीचे बिंग फुटले आहे. पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत दिग्रस बु. येथे विवाहित महिला सारिका विकास गवई (२७) यांनी ११ ऑगस्ट रोजी दुपारी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
हेही वाचा – सोयाबीनवर ‘पिवळा मोझक’ रोगाचे आक्रमण; ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका
१२ ऑगस्ट रोजी पोलिसांना उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये विवाहितेची गळा दाबून हत्या केल्याचे उघडकीस आले. या हत्येप्रकरणी शनिवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. सैनिक पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याचा बनाव उघडकीस आला तरी पत्नीच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.