अकोला : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षीय चिमुकला घरासमोर खेळ असताना अचानक बेपत्ता झाला. सर्वत्र शोधाशोध सुरू असताना सायंकाळच्या सुमारास मोर्णा नदी पात्रात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. तुषार भूषण गव्हाळे (४) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. चिमुकला नदी पात्रापर्यंत नेमका कसा पोहोचला? असा प्रश्न असून पोलीस सखोल तपास करीत आहेत.

पालकांनी लहान मुलांच्या बाबतीत काळजी घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. लहान मुले खेळत असतांना त्यांच्यावर लक्ष ठेवणे देखील आवश्यक असते. अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो. अकोला शहरात अशाच एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. शहरापासून जवळच असलेल्या आगर गावातील धनगर पुरा प्लॉटमध्ये १९ मे रोजी सकाळी तुषार भूषण गव्हाळे हा चार वर्षीय मुलगा खेळत होता. खेळ असतांना तो अचानक बेपत्ता झाला. परिसरात शोधाशोध करण्यात आली. मात्र, तो दिसून आला नाही. अखेर घाबरलेल्या कुटुंबीयांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात धाव घेतली. चार वर्षीय चिमुकला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

अकोट फैल पोलिसांनी लाल रंगाचे टी-शर्ट व काळ्या रंगाची चड्डी घातलेल्या सावळा वर्णाचा मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. पोलीस व कुटुंबीय चिमुकल्याचा शोध घेत असतांनाच नको तेच घडल्याचे समोर आले. मोर्णा नदी पात्रात चिमुकल्या तुषार गव्हाळे याचा मृतदेह आढळून आला. याचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोष केला. चिमुकल्या तुषारचा मृत्यू झाल्याने गव्हाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अकोट फैल पोलीस पुढील तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेस्थानक चौकात जीवघेणा हल्ला

अकोला रेल्वेस्थानक परिसरात दोन गटामध्ये परस्पर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आदित्य मानवटकर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातून दोन गटामध्ये चाकू, लोखंडी रॉडने वार करण्यात आले. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस तपास करीत आहेत.