अकोला : जीवन हे क्षणभंगूर असून देह हा नश्वर आहे. जीवनातील शेवटचे स्थळ हे मोक्षधामच. मृतात्म्याचा अंतिम प्रवास सुखकारक व्हावा व परिजनांना सुविधा मिळण्याच्या दृष्टीने शहरातील सिंधी कॅम्प मोक्षधामाचा विकासात्मक कायापालट करण्यात आला. लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउन, प्रताप आहुजा व सुनील जेसवानी कुटुंबीयांनी स्वखर्चातून हे कार्य केले.

शहरातील सिंधी कॅम्प मोक्षधामची दुर्दशा झाली. त्यामुळे येथे येणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मुक्तीधामाचा कायापालट करण्याचे निश्चित केले. लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउन, प्रताप आहुजा व सुनील जेसवानी कुटुंबीयांनी मुक्तीधामाची संपूर्ण स्वच्छताच नव्हे तर परिसराचे सौंदर्यीकरण करून त्याचे रुपडे पालटले. लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनचे अध्यक्ष सुनिल जेसवानी, आहुजा कुटुंबीयांनी समाजातील सर्व घटकांच्या समस्यांचा विचार करून हे पाऊल उचलले.

हेही वाचा : भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाचे जागावाटपाबाबत ठरले! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणतात, “डिसेंबरअखेर चर्चा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिसरात मोठे शेड उभारून एकाच वेळी चार मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी ओटे तयार केले. मृतांच्या परिजनांना बसण्याची सोय व पेय जलाची व्यवस्था केली. या कार्यासाठी पू.सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रमेश जग्यासी, भैरूमल वाधवानी, हरीश आलिमचंदानी, मनोहर पंजवानी, सुरेंद्र नागदेव, अनिल जेसवानी, प्रकाश आनंदानी, सुभाष चांडक, अश्विनकुमार बाजोरिया, रमाकांत खेतान, अनुप देशमुख, ॲड. राजेश चावला आदींचे सहकार्य लाभले.