भंडारा : आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम चांगलीच जोर पकडून लागली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणी, नेतेमंडळी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सोशल मीडियाचा परिपूर्ण वापर करताना दिसत आहेत. सोबतच मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध विकासकामांचे श्रेय लाटत समाज माध्यमांवर पोस्ट टाकण्याची जणू शर्यतच लागली आहे. अशीच एक पोस्ट भंडारा जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी टाकली असून या पोस्टवर नेटकऱ्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.

आज तुमसर तालुक्यात होऊ घातलेल्या विविध प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी आणि माजी आमदार डॉ. परिणय फुके यांनीही आपापल्या हस्ते होणार असल्याचे सांगणारी पोस्ट टाकली. हाच धागा पकडत “एका बायकोचे दोन नवरे” असे शीर्षक देत सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे हे भूमिपूजन नेमके कोणाच्या हस्ते होणार, हे कळायला मार्ग नाही. मात्र या पोस्टमुळे भंडारा जिल्ह्यात दोन्ही आजी-माजी आमदारांची चर्चा गल्लोगल्लीत रंगली असून हा एक मोठा विनोदच असल्याची चर्चा राजकीय मंडळी करू लागले आहेत.

Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

हेही वाचा…गडचिरोलीत भाजपचा नवीन चेहरा ?

राजकीय मंडळींच्या सोशल मीडियावरील पोस्ट आता भंडारा जिल्हावासीयांसाठी नवीन विषय राहिलेला नाही. आगामी लोकसभा व तद्नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मीच कसा विकासाचा महामेरू आहे, मीच सर्वसामान्यांना कसा न्याय देऊ शकतो, हे धारिष्ट दाखवण्याचा अनाहुत प्रयत्न राजकारणी, नेतेमंडळी करू लागले आहेत. कधी एखादा नेता आपला वाढदिवस आपणच साजरा करतो आणि सोशल मीडियावर माझा वाढदिवस जनतेने साजरा केल्याचे पेरतो, तर कधी भावी आमदार, भावी खासदार अशा पोस्टला उधाण येते. आता प्रसारित होत आहे ती आजी माजी आमदारांची एक पोस्ट. निमित्त आजच्या भूमिपूजन सोहळ्याचे. आज दुपारी १ वाजता तुमसर शहरातील विविध कामांचे भूमिपूजन होणार आहे. मात्र, भूमिपूजनाचा पावडा नेमका कुणाच्या हाती येईल हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुळात दोन्ही आजी-माजी आमदारांनी एकाच जागेचे भूमिपूजन आपल्या हस्ते होणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे जिल्ह्यातील जनताही संभ्रमात पडली आहे. या दोन्ही नेत्यांना नेमके काय दाखवायचे आहे, याचा बोध कळलेला नसावा वा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, याच आविर्भावात दोन्ही नेते सोशल मीडियावर पोस्ट टाकून मतदारांना भुलवण्याचा तर प्रयत्न करत नाही ना, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांनाही पडला आहे.

हेही वाचा…‘समृद्धी’ला दीड वर्षांतच भगदाड, महामार्गावरील पुलावर भलामोठा खड्डा; बांधकामाच्‍या दर्जाविषयी…

राज्यात महायुतीचे सरकार असून जिल्ह्यात महायुतीच्या नेते मंडळींमध्ये समन्वय नसल्याचे हे द्योतकच म्हणावे लागेल. श्रेय घेण्याच्या व लाटण्याच्या प्रयत्नात या दोन्ही नेतेमंडळींनी जिल्ह्यात महायुतीला फाटा दिला असून मीच श्रेष्ठ या आविर्भावात जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगत आहे. तुमसर शहरातील भूमिपूजनाचा मान तुमसर क्षेत्राच्या विद्यमान आमदारांचा असतो, असेही काही मंडळी व्यक्त झालेत.