बुलढाणा : पीडितासह तिचे वडील, काका फितूर झाले असतांनाही येथील न्यायालयाने आरोपी युवकास ३ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी गुन्हेगारांना जरब बसविणारा हा निकाल दिला. या वैशिष्ट्यपूर्ण खटल्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे. मागील ऑगस्ट २०१९ मध्ये हा घटनाक्रम घडला होता. सागर अंबादास इटकर (वय २२, रा. गौरक्षणवाडी चिखली) हा १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. यामुळे तिच्या वडिलांनी काकासह युवकास जाब विचारला. यावेळी उद्धट उत्तरे देऊन आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले होते. पिडीतेच्या वडिलांनी फिर्याद दिली. चिखली पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम ३५४-ड,३२४,५०६ भा.दं.वि. आणि बाललैगिंक अत्याचार संरक्षण अधिनियमचे सहकलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
nagpur wife murder for 200 rupees marathi news
दोनशे रुपयांसाठी पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या, आता मागितली शिक्षेत सुट; न्यायालयाने…
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी बुलढाणा न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे एकुण ९ साक्षीदार व पुरावे सादर केले. मात्र धक्कादायक म्हणजे, पिडीतेचे वडील, काका, व स्वतः पिडीता हे पुरावा नोंदवितेवेळी सरकारी पक्षाला फितूर झाले! मात्र पिडीतेच्या वडिलांना डोक्यावर झालेली जखम ही आरोपीने दगडाने केलेल्या मारहाणीमुळे झाली होती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक तनपुरे यांचा पुरावा , पिडीतेच्या वडिलांचे वैद्यकीय प्रमाणपत्र , तपास अधिकारी सचिन चव्हाण यांचा पुरावा, गुन्हा दाखल अधिकारी अताउर रहमान अब्दुल रउफ शेख व पिडीतेच्या जन्मतारखेबाबत नगर पालिका बुलढाणाचे कर्मचारी प्रसन्नजित रंगनाथ इंगळे यांचा पुरावा निकालात महत्वाचा ठरला.

हेही वाचा : सायबर गुन्हेगार खेळतायेत जनधन योजनेचे ‘स्क्रॅच क्रार्ड’, ५ हजार रुपये खात्यात टाकण्याचे आमिष

अभियोग पक्षातर्फे फितूर साक्षीदार यांना विचारण्यात आलेल्या सुचक प्रश्नांची समर्पक उत्तरे या आधारे विशेष न्यायाधीश . आर. एन. मेहरे यांनी वरील निकाल दिला. फिर्यादी पिडीतेचे वडिल फितूर झाल्या कारणाने त्यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही फौजदारी प्रकिया संहिता कलम ३४४ प्रमाणे करण्याचे आदेशही न्यायालयाने पारीत केला. सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. हवालदार नंदराम इंगळे यांनी ‘कोर्ट पैरवी’ म्हणून सहकार्य केले.