बुलढाणा: आघाडीतील लोकसभा उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे असतांना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत हे आज सकाळी कारंजा (जिल्हा वाशीम) येथे दाखल झाले. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत बंदद्वार चर्चा केली. या चर्चेत नेमके काय शिजले यावरून बुलढाणा मतदारसंघात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज बुधवारी( दि १३) कारंजा लाड व वाशिम येथे त्यांच्या सभा लावण्यात आल्या आहे. या धामधुमीत नरेंद्र खेडेकर व जालिंदर बुधवत यांनी त्यांची सकाळीच कारंजा लाड येथे तातडीची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या दोघासमवेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर, निवडणुकीवर चर्चा केली. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध राजकीय विषयावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. तसेच मागील महिन्यात झालेला अर्धवट दौरा आणि मेहकरच्या सभेची संभाव्य तारीख यावरही चर्चा झाली.

हेही वाचा : अकोला लोकसभा मतदारसंघात गठ्ठा मतपेढीवर लक्ष, कुणबी समाज केंद्रस्थानी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेडेकरच उमेदवार?

या तातडीच्या भेटीनंतर खेडेकर व बुधवत हे शिलेदार मेहकरात दाखल झाले. दरम्यान या भेटीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात विविध चर्चांना उधाण आले. बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांचे ‘तिकीट फायनल’ झाल्याची चर्चाही पसरली आहे. उबाठा बरोबरच मित्र व शत्रू पक्षातही या भेटी बद्दल विविध तर्क लावण्यात येत आहे.