बुलढाणा : अपघातात गंभीर जखमी झालेला रुग्ण उपचारादरम्यान दगावल्यावर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह रुग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात आणली. जोपर्यंत आरोपी चालकास अटक करत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले. त्यानंतर हे सोयरे शांत झाले आणि अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले. हा थरारक घटनाक्रम बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात घडला.

हेही वाचा : डान्स हंगामात आक्षेपार्ह व्हिडीओ; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलढाणा ते देऊळघाटदरम्यान नजीकच्या एका दुचाकीस्वाराला ऑटोरिक्षाने धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज, बुधवारी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ऑटोचालक फरार होता. त्यामुळे मृताच्या संतप्त नातेवाईकांनी संभाजीनगर येथून मृतदेहासह रुग्णवाहिका थेट बुलढाणा पोलीस ठाण्यात आणली. त्यामुळे पोलीस कर्मचारीही हादरले. पोलिसांची धावाधाव सुरू झाली. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून चालकाला पकडले. तेव्हाच मृताच्या नातेवाईकांचा राग शांत झाला. मृतदेह ताब्यात घेऊन ते अंत्यसंस्कारासाठी देऊळघाटला रवाना झाले.