चंद्रपूर : मध्यचांदा वनविभागाचे चिवंडा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.१३८ मध्ये वाघाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत वाघ मादी असून तिचे वय सात ते आठ महिने असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वाघिणीच्या शरीरावर ओरखडल्याचे निशाण आढळले आहेत. मृतक वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेत. प्रौढ नर वाघाचे लढाईत या सात ते आठ महिन्यांच्या मादीला मारल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा : बुलढाणा : खळबळजनक! राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील तपास उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक शेंडगे यांचा मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे करीत आहे. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.