चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील खंबाडा ते मुराडगाव रस्त्याच्या कडेला वाहणाऱ्या वायगाव नाल्याजवळ रविवारी वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृत वाघिणीचे वय सुमारे तीन वर्षे असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच वरोरा वन परिक्षेत्र कार्यालयाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

हेही वाचा : शिवमहापुराण कथेच्या आयोजनामुळे पर्यावरणाला धोका! मानव-वन्‍यजीव संघर्ष…

police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. या घटनेबाबत वरोरा वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांना विचारले असता, वाघिणीच्या अंगावर जखमा असून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.