नागपूर : एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. विरोध केला असता तिला मारहाण करून धमकावले. या प्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय पीडित महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवित आरोपी व्यवस्थापकाला अटक केली. राकेश रमेश चिमनकर (४२) रा. हरिओम सोसायटी, दत्तवाडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

राकेश आणि पीडित महिला दोघेही एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करतात. रविवारी सायंकाळी राकेशने पीडितेला कामाच्या बहाण्याने कंपनीत बोलावले. ती एकटी असल्याची संधी साधून तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचाराचा प्रयत्न करू लागला. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तिला पैशाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी केली.

हेही वाचा – नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी एकाच मंचावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली. महिलेने घटनेची तक्रार एमआयडीसी पोलिसात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी राकेशला अटक केली.