नागपूर : लक्ष्मीपुजनाच्या निमित्त शहरात विविध भागात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. शहरातील विविध भागात १७ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी काही भागांत आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बहुतांश आगी या कचऱ्याचे ढीग असलेल्या ठिकाणी लागलेल्या आहे. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वच आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे मोठ्या दुर्घटना टळल्या आहेत.

हेही वाचा : तहसील पोलिसांनी आणखी ९ पिस्तूल केले जप्त; १८ पिस्तूल आणि १३६ काडतूस जप्त

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?

दिवाळीला दरवर्षी फटाके फोडले जात असतात, त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडत असतात. यावेळी फटाके फोडण्यासाठी ८ ते १० मर्यादा ठेवण्यात आली होती. फटाक्यामुळे शहरात विविध ठिकाणी आगीच्या १७ घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. यामध्ये शहरातील त्रिमूर्ती नगरला ३, लकडगंज २ घटना आगीच्या घटना घडल्या तर गंजीपेठ, कॉटन मार्केट, सुगत नगर, वैशालीनार, महाल परिसरातही आग लागल्याच्या घटना घडल्या. शंकरनगर दंडिगे ले आऊटच्या एका सभागृहाच्या टेरेसवर आग लागली. सुगतनगर ययेथील महापालिकेच्या शाळेला लागून कचऱ्याचा ढीग पडला असताना तिथे आग लागली. आग पसरण्याच्या आधी त्यावर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा : लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा का केली जाते? काय आहे महत्त्व? वाचा…

गणेशपेठ येथे कुंभलकर महाविद्यालयाला लागून असलेल्या मुकेश झोपाटे यांच्या घराला आग लागली मात्र या ठिकाणी अग्निमशन विभागाने तात्काळ आग विझवली. कुठल्याच घटनेत जिवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. यातील बहुतांश आगी या सायंकाळी सहानंतर लागल्यामुळे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली.