नागपूर : तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही परंपरा, संस्कृती आणि काही गोष्टींचे धार्मिक महत्त्व कमी होत नसल्याचे दिवाळीसारख्या सण-उत्सवात दिसून येते. लक्ष्मी पूजनाला आवर्जून स्थान असणाऱ्या केरसुणीची पूजा का केली जाते, याबाबत ज्योतिषाचार्य प्रीती राजंदेकर यांनी सांगितले आहे की, दिवाळी खरेदीत आकाश कंदील, पणत्या, फटाके आणि कपड्यांसोबत नव्या केरसुणीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी करून लक्ष्मी पूजनाला तिची पूजा करण्याची परंपरा असल्याने आजही केरसुणी बाजारात आपले अस्तित्व टिकवून आहे. शहरात महाल, इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा आदी बाजारांसह अनेक ठिकाणी केरसुणीची विक्री करणारे लोक दिसून येत आहेत. दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे. केरसुणीला लक्ष्मी असे म्हणतात. त्यामुळे तिची पूजा केली जाते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा पाळली जाते.

हेही वाचा : ‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन; पालकमंत्र्याच्या घरासमोर साजरी केली काळी दिवाळी

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक

पूजनासाठी केरसुणीला देखील मागणी आहे. केरसुणीला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. ही लक्ष्मी अर्थात केरसुणीचे दर यंदा ५ ते १० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेते सांगतात. लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असलेली केरसुणी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरेदीसाठी विशेष पसंती देत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या केरसुणीला दिवाळीत पूजनासाठी महत्त्वाचे स्थान असते. परराज्यातूनही केरसूणी बाजारात विक्रीला येत आहे.

हेही वाचा : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना अनुभवावर गुण, पण लाभ शून्य! सरळसेवा भरतीत नोकरी मिळणार कशी?

मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडांच्या पानापासून केरसुणी तयार केली जाते. राज्यात ही झाडे नष्ट झाली असून, शिंदीचे पान मध्यप्रदेशातील इंदूर, फतीयाबाद, चौरण येथून आयात केले जाते. केरसुणीची ६० रुपये ते १०० रुपयांना जोडी विकली जाते. तर आधुनिक झाडूची किंमत १५० ते २०० रुपये दरम्यान आहे.