नागपूर : राज्यात गद्दारांच्या जीवावर सरकार आले आहे. एक गद्दार दुसऱ्याला पत्र देतो अशी स्थिती आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. रोहित पवारांनी काढलेली युवा संघर्ष यात्रा म्हणजे बालमित्र मंडळ असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘कोण आहे अमोल मिटकरी. काय आहे त्यांचा संघर्ष, अशा लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे नसतात’ म्हणत आव्हाडांनी मिटकरींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

हेही वाचा : “शेतकरी मेले तरी चालेल, अशी मोदी सरकारची भूमिका”, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांद्याच्या प्रश्नावर बोलताना आव्हाड म्हणाले, ‘कांद्याचा प्रश्न उग्र होत चालला आहे. सरकारने निर्यातबंदी घालून शेतकऱ्यांना उद्धवस्त केले आहे. यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा बरबाद होईल.’ संघर्ष यात्रेवर बोलताना त्यांनी रोहित पवार लोकांमध्ये गेल्याचे कौतुक केले. सरकार टीका करत आव्हाड म्हणाले, ‘हे सरकार केवळ गद्दारांवर चालणारे आहे. गद्दारांचे सरकार आहे. गद्दारांना कसे चालवायचे, त्यांना कसे सांभाळायचे यातच हे सरकार गुंतलेले आहे’ असेही आव्हाड म्हणाले.