नागपूर : विज्ञानाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेस, फार्मास्युटिकल काँग्रेससारख्या परिषदेचे यजमानपद भूषविल्यावर आता १३ व्या थर्मोडायनामिक्स परिषदेचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळणार आहे. इंडियन थर्मोडायनामिक्स सोसायटीच्या वतीने विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान ही राष्ट्रीय परिषद पार पडेल.

विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचा यंदा हीरक महोत्सवी वर्ष सुरु आहे. यानिमित्ताने तेराव्या थर्मोडायनामिक्स परिषदेचे यजमानपद नागपूर विद्यापीठाला देण्यात आले आहे. इंडियन थर्मोडायनामिक्स सोसायटीची स्थापना २००१ साली करण्यात आली होती. याचे मुख्यालय अमृतसर येथे आहे. २००५ साली सर्वात पहिली परिषद अमृतसर येथील गुरुनानक देव विद्यापीठात पार पडली. यंदा तेरावी परिषद विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात होईल.

हेही वाचा : वर्धा : किडनी प्रत्यारोपणात अव्वल, ‘या’ रुग्णालयाची शतकी कामगिरी

तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन २६ ऑक्टोबरला होणार असून यात देशभरातील थर्मोडायनामिक्स विषयातील तज्ज्ञ,संशोधक सहभाग घेतील. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचे,वस्तुचे तापमान असते. या उर्जेचा, तापमानाचा आपल्यावर होणारा प्रभाव थर्मोडायनामिक्स विषयाच्या अंतर्गत करण्यात येतो. थर्मोडायनामिक्स परिषदेत याच्या विविध पैलूवर चर्चा करण्यात येईल, तसेच या क्षेत्रातील नव्या संशोधनाबाबत माहिती दिली जाईल.

हेही वाचा : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये डॉक्टरांच्या प्रतीक्षेत, बालरोगतज्ञ आणि परिचारिकांसह सुमारे २०० पदे वर्षानुवर्षे रिक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात दुसऱ्यांदा आयोजन

थर्मोडायनामिक्स परिषदेचे यंदाचे १३ वे पर्व आहे. नागपूरमध्ये यापूर्वी २००८ साली तिसरी थर्मोडायनामिक्स परिषद घेण्यात आली होती. परिषदेचे दुसऱ्यांदा यजमानपद भूषविणारे नागपूर एकमेव शहर आहे. पहिली परिषद २००५ साली अमृतसर येथे झाली होती. शेवटची बारावी थर्मोडायनामिक्स परिषद २०१७ साली हरियाणामधील हिसार येथे घेण्यात आली होती.