नागपूर : यशोधरानगरात राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेची गुजरातमध्ये तीन युवकांना विक्री करण्यात आली. त्या महिलेवर तिघांनी ३६ दिवस सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने तीनपैकी एका तरुणाला अटक केली. तर त्या महिलेची विक्री करणाऱ्या दलाल नंदा पौनीकर हिलाही अटक करण्यात आली. यशोधरामध्ये राहणारी महिला सीमा (काल्पनिक नाव) हिने एका युवकाशी प्रेमविवाह केला. दोघांनी अत्यंत गरिबीत संसार सुरु केला. ती धुणी-भांडी करण्याच्या कामावर जाऊ लागली तर पती मोलमजुरी करायला लागला. दाम्पत्याच्या संसारात बाळ आल्यानंतर दिवसेंदिवस आर्थिक स्थिती खालावली.

पती मुंबईला बांधकामावर मजुरी करायला गेला. सीमा चिमुकल्या मुलीसह एकटी राहायला लागली. यादरम्यान, नंदा पौनीकर आणि मंगला ताबे नावाच्या दोन दलालांनी सीमाला हेरले. तिच्या गरीबीचा फायदा घेण्याचे ठरवून तिला गुजरात-जामनगरात एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी मुले सांभाळण्याची नोकरी देण्याची बतावणी केली. चांगला पगार मिळत असल्याने तिने पतीची संमती मिळवून मंगला आणि नंदा यांच्यासोबत गुजरात गाठले. दोघींनीही तेथे प्रतिक चंद्रा, गोलू आणि संतोष या युवकांना महिलेची विक्री केली.

pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

हेही वाचा : दिल्ली व गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे रोखणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा

सीमाला शेतातील घरात नेले. तेथे तब्बल ३६ दिवस तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. सीमाने एका शेतकऱ्याच्या मदतीने तेथून सुटका केली आणि नागपूर गाठले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. एएचटीयू विभागाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून नंदा पौनीकर आणि प्रतीक चंद्रा (जामनगर, गुजरात) यांना अटक केली. सीमावर बलात्कार करणारे गोलू आणि संतोष तसेच दलाल मंगला ताबे यांचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपी प्रतीक चंद्रा आणि नंदा पौनीकर सध्या पोलीस कोठडीत आहेत.