वर्धा : ‘रोडकरी’ म्हणून अख्ख्या देशात ओळख असलेल्या केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बांधलेले उड्डाणपूल व महामार्गांची भरभरून चर्चा होते. नितीन गडकरी यांच्या कामाची प्रशंसा होत नसल्यास नवलच. पोटातील पाणी हलणार नाही, असे गुळगुळीत रस्ते झाल्याचा दावा खुद्द नितीन गडकरी करतात. शंभर वर्षे या कामांना काहीच गालबोट लागणार नाही, असाही दावा होत असतो. मात्र, हा दावा फोल करणारा एक भयावह प्रकार उजेडात आला आहे आणि तोही नितीन गडकरी यांच्याच विदर्भात. या प्रकारामुळे नागरिक चिंतेत पडले आहे.

हिंगणघाट येथून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४४ वरील रस्त्यावर नांदगाव चौक आहे. या ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराज उड्डाणपूलावर मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध पडलेल्या या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले. दुचाकी उसळून अनेक आपटले, जखमी झालेत, मात्र उड्डाणपुलाची दुरुस्ती झालेली नाहीच. महामार्गावरील वाहतुकीस यामुळे अडथळे निर्माण होतात. वाहनचालकांना हा खड्डा चुकवून गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यावर तात्पुरते जाड खर्डे ठेवण्यात आले. मात्र तरीही खड्डा झाकल्या जात नाही. म्हणून कुणाचा जीव जाण्याची वाट प्रशासन बघते कां, असा प्रश्न संतप्त नागरिक सोशल मीडियावर उपस्थित करीत आहेत.

ठाण्यातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडी; माजिवाडा उड्डाणपुलासह खारेगाव टोलनाका भागात खड्डे
Permanent ban on heavy vehicles day time in lonavala, Traffic of heavy vehicles, traffic of heavy vehicles Mumbai Pune highway by alternative route, lonavala news, heavy vehicles traffic on lonavala,
लोणावळ्यात कायमस्वरुपी दिवसा जड वाहनांना बंदी; मुंबई-पुणे महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने
sangli, Speeding Tanker Kills One, Speeding Tanker Kills One Injures Two at Dhawadwadi village, Dhawadwadi village in jat taluka, Driver Apprehended by Citizens, sangli district, accident news
सांगली : टँकरची तिघांना धडक; एक ठार, दोन जखमी
Traffic of light weight vehicles started from Anuskura Ghat
प्रवाशांना दिलासा; अनुस्कुरा घाटातून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू
Raigad, highway, mumbai goa,
रायगड : मुंबई गोवा महामार्गावर दरडींची टांगती तलवार, रुंदीकरणाच्या कामामुळे दरडींचा धोका वाढला
poor cement concrete work on highway was investigated by the police
महामार्गावरील सिमेंट काँक्रीटच्या निकृष्ट कामाची पोलिसांनी केली पोलखोल
Residents of MIDC distressed by overnight digging of Metro on Shilphata Road in Dombivli
डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोच्या रात्रभराच्या खोदाईने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त
Employees prefer to work from home to avoid mega block
महामेगाब्लॉकचा ताप टाळण्यासाठी नोकरदारांचे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य, लोकल अर्धा तास उशिराने

हेही वाचा…राज्यातील ३२ जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण; ‘हे’ उपाय आवश्यक…

या महामार्गावरील उड्डाणपुलावरून प्रामुख्याने जड वाहने धावतात. तसेच विस्तीर्ण महामार्ग असल्याने चारचाकी वाहने सुसाट धावतात. काही काळ सुरक्षा कठडे दिसले, पण ते पुरेसे नसल्याची ओरड होत आहे. कारण वाहतूक नियमांचे पालन होत नाही. यावर त्वरित दुरुस्ती काम होणार असल्याचे सांगण्यात येते. पण हे काम काही सुरू झालेले नाही. हे काम म्हणजे निकृष्ट बांधकामाचा उत्तम नमुना असल्याची टीकाही सुरू झाली. मात्र, प्रशासन जणू काही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे एकूणच ढिम्म कारभार पहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत संताप वाढत चालला आहे.

हेही वाचा…चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाची अदलाबदली; आईच्या सतर्कतेमुळे भोंगळ कारभार उघडकीस

अलीकडच्या काळात भव्य महामार्ग तसेच उड्डाणंपुलांची बांधकामे झालीत. त्यामुळे वाहतूक सुकर झाल्याने नागरिक सुखावले. पण आता खड्डे पडणे, पथदिवे बंद असणे, वाहतूक नियमनाचा अभाव, असे व अन्य प्रकार डोकेदुखी ठरत आहेत. बांधकामापश्चात यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा कुठे गेली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.