वर्धा : पालिका निवडणूक आता चरम सीमेवर आली आहे. युती, आघाडी करण्याचे गुऱ्हाळ आटोपत नसून उमेदवारी प्राप्त करण्यासाठी चढाओढ आहेच. सर्वाधिक गर्दी भाजपच्या उमेदवारीसाठी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक भाजप नेत्यांचे उंबरठे झिझवत आहे. सायंकाळ होऊनही सर्व प्रभागाचे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार एकाही पक्षाने जाहीर केलेले नाही. मात्र वर्धा पालिकेत बहुतांश उमेदवार निश्चित झाले असून काहींना एबी फार्म पण देण्यात आले.

आज सायंकाळी नावे निश्चित झाल्यानंतर या उमेदवारांना आवश्यक ते एबी फॉर्म मिळाले. नौशाद शेख हे म्हणाले की मला भाजपने उमेदवारी दिली आहे. तसा अर्ज मला मिळाला. अन्य भाजप उमेदवार असे राहणार.

प्रभाग २ – विजय उईके व मुक्ता पिसे, ३ – सचिन होले व सोनल त्रिवेदी, ४ – सतीश वैद्य व वंदना चमटकर, ५ – निशा गोसावी व विलास आगे, ६ – राहूल करंडे व तरुण्णम शेख नौशाद, ७ – रवी उमरे व श्रेया देशमुख, ८ – वैष्णवी मेघे व प्रफुल्ल शर्मा, १० – वंदना भुते व पवन राऊत, ११ – स्वाती गव्हाणे व प्रदीप तलमले, १२ – अभिषेक त्रिवेदी व दुसरी जागा रिक्त, १४ – गिरीश अग्निहोत्री व संजीवनी वंजारी, १५ – डॉ. सुनील चावरे व प्रियंका खंगार, १६ – सोनाली तडसे व महेश भाटिया, १७ – प्रताप मेश्राम व राखी पांडे, १८ – सुनीता वैद्य व रामविलास साहू, २० – कैलास राखडे व मेघना त्रिमाले.

प्रभाग १, ९ व १३ या प्रभागातील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. या प्रभागात तिकीट मिळण्यासाठी चांगलीच रस्सीखेच दिसून येत आहे. या यादीत नव्या, जुन्याचा सामान्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते. मात्र अनेक दिग्गज उमेद्वारांना घरी बसविण्यात आल्याचेही स्पष्ट होत आहे. प्रदीप ठाकरे, वरुण पाठक असे भाजप नगरसेवक पून्हा उमेदवारी मिळवू शकले नाही. भाजप उमेदवारीसाठी चढाओढ असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात अनेक कसरती भाजप नेत्यांना कराव्या लागत असल्याचे दिसून येते. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्यावर या संदर्भात चांगलाच दबाव असल्याचे चित्र आहे.

नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. नीलेश किटे की प्रदीप ठाकूर यापैकी एक की नवाच चेहरा येणार याबाबत उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर या दोघांच्या प्रभागातून उमेदवार जाहीर झालेले नाही. उद्या सोमवारी सर्व चित्र स्पष्ट होईल, असे भाजप वर्तुळ सांगते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कडे चांगलाच कल वाढल्याचे झालेल्या गर्दीतून दिसून येत आहे.