वर्धा : वर्धा हिंगणघाट रेल्वे मार्गावर कवाडघाट येथे पुलाच्या पेंटिंगचे काम सुरू आहे. रविवारी सायंकाळी याठिकाणी पेंटिंग करणाऱ्या दोन मजुरांचा पुलावरून पडून मृत्यू झाला. एकाचा जागेवरच तर दुसऱ्यास वेळेवर उपचार मिळू न शकल्याने तो सेवाग्राम रुग्णालयाच्या गेटवरच दगावला. आता तर त्यांच्या परिवाराचे दुर्दैवाचे दशावतार सुरू आहे. विजय शर्मा व फिरोज खान अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा परिवार विमनस्क अवस्थेत दवाखान्यात बसून आहे.

घटनेवेळी त्यांना काहीच मदत मिळाली नसल्याचे ते सांगतात. रात्री दाखल करण्यास आले असतांना परिसराचे गेट उघडण्यात आले नाही. पाच तासांनी गेट उघडले तेव्हा वेळ निघून गेली होती. तडफडून त्याचा मृत्यू झाला. ते पाहून संबंधित रेल्वे कंत्राटदार चंदन बेंदे याने पळ काढला. हा परिवार राजस्थान येथील आहे. पडल्याने त्यांचा मोबाईल पण फुटला. त्यामुळे संबंधित लोकांना कळविणे शक्य होत नसल्याचे येथे उपस्थित समाजसेवक मंगेश भुते यांनी सांगितले.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
bus-two wheeler accident, Grand daughter died,
बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू

हेही वाचा : चंद्रपूर : प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा; आठ जण रुग्णालयात दाखल

अन्य कामासाठी आलेले एक पोलीस शिपाई म्हणाले की हा कंत्राटदार प्रतिसाद देत नाही. त्याने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला आहे. उपाय नसल्याचे ते म्हणाले. निरक्षर असल्याने तसेच बोली काळात नसल्याने पुढे काय करायचे त्याबाबत सर्व चिंताग्रस्त दिसून आले. या परिवारास कोणी मदत मिळवून देणार का, असा प्रश्न उपस्थित केल्या जातो. कारण शव विच्छेदन किटसाठी पण पैसे नसल्याने सर्व थांबले आहे.