वाशीम : मालेगांव तालुक्यातील करंजी येथील सुधाकर किसन कांबळे यांच्या गोठ्याला आज २८ फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक आग लागली. आग एव्हढी भीषण होती की, गोठ्यातील ३९ शेळ्या व इतर साहित्य जाळून राख झाले आहे. यामुळे अंदाजे दहा लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… ‘अवयव तस्करी प्रकरणाचा नक्षलवाद्यांशी संबंध.., गोंदियाचे ‘एसपी’ निखील पिंगळे म्हणाले, विशेष तपास सुरू

हेही वाचा… अहीरांच्या पराभवाला मुनगंटीवार तर माझ्या पराभवाला…, माजी खासदार चंद्रकात खैरेंचा थेट आरोप

करंजी येथील सुधाकर किसन कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेळी पालन करतात. त्यांच्या गोठ्यात ३९ बकऱ्या बांधलेल्या होत्या. आज २८ फेब्रुवारी रोजी सकाळी गोठ्याला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने क्षणात गोठ्यातील शेळ्या जळून खाक झाल्या. तसेच शेजारील शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले. तलाठ्यांनी पंचनामा केला असून १० लाख ५१ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या गोठ्याला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In washim district 34 goats buried alive due to fire incident pbk 85 asj
First published on: 28-02-2023 at 17:24 IST