ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील घटना

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी भागात गजराज नावाचा नर हत्ती अचानक आक्रमक झाला असता तिथे पोहचलेल्या सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी कुलकर्णी व ताडोबाचे लेखापाल प्रमोद गौरकर यांच्यावर अचानक हल्ला केला. दरम्यान, दुर्दैवाने घडलेल्या हत्तीच्या या हल्लय़ात लेखापाल गौरकर यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळची आहे. करोना टाळेबंदीत ताडोबा व्याघ्र प्रकल्प बंद असताना अधिकारी रात्रीच्या वेळी ताडोबात गेलेच कसे, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

हत्ती अचानक आक्रमक झाला. या वस्तुस्थितीची माहिती नसताना कोळसा वनपरिक्षेत्रचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी कुलकर्णी आणि मुख्य लेखापाल प्रमोद गौरकर त्याच भागात फिरत होते. त्यांचे वाहन चिखलात अडकले आणि जवळच हत्तीकडे पहात त्यांना वाहन सोडले. या प्रक्रियेमध्ये हत्तीने दोघांवर हल्ला केला आणि दुर्दैवाने टीएटीआरचे मुख्य लेखापाल गौरकर या घटनेत मरण पावले. रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि पशुवैद्य आणि टीएटीआरचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि हत्तीला शांत आणि संयमित ठेवण्यासाठी ऑपरेशन चालू आहे. आजूबाजूच्या गावांना याविषयी सतर्क केले गेले आहे आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी वाहन चिखलात फसले असे म्हटले असले तरी मे महिन्याच्या तीव्र उन्हाळय़ात तिथे चिखल आला कुठून, अधिकारी रात्रीच्या सुमारास बंद असलेल्या ताडोबात गेलेच कसे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक तथा इतरांची पार्टी सुरू होती, तिथे एक कंत्राटदारही उपस्थित होता, असेही सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशीही मागणी समोर आली आहे.