scorecardresearch

“भारत लवकरच विश्वगुरूपदी आरुढ होईल,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; म्हणाले…

वाशिम येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते.

mohan bhagwat, world global, leader, washim
“भारत लवकरच विश्वगुरूपदी आरुढ होईल,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; म्हणाले…

वाशिम : भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे. सर्व जगातल्या लोकांना कसे जगावे, हे शिकविण्याची आपली जबाबदारी आहे. जगाला धर्म देण्यासाठी भारताला जगायचे आहे. आपापल्या संप्रदायाचे काम प्रत्येकाने सातत्याने केले पाहिजे, त्यासाठी समाजाचा व्यूह तयार व्हायला पाहिजे. लोकहितातून देशहीत साधायचे आहे. अशाने भारत देश विश्वगुरूपदी आरूढ झालेला लवकरच आपणास पाहायला मिळेल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते. ते पुढे म्हणाले, १८५७ पासून भारताच्या उत्थानास प्रारंभ झाला. नियती भारताला विश्वगुरूपदी आरूढ करणारच आहे. आमच्या पूर्वजांनी धर्माला अनुसरून कर्म दिले आहेत. संघात शाखा सर्व काही आहे पण कुठेही अतिवादिता नको. मनुष्याला आपल्या सेवेची योग्यता टिकवावी लागते.

Dattatreya-Hosbale
“आता वेळ आली आहे भारताचा खरा इतिहास सांगायची” – संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे
Navi Mumbai Municipal Commissioner Rajesh Narvekar went to the reservoir for ganesh immersion
नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वतः तराफ्यावरून जलाशयात उतरले, स्वयंसेवकांचा उत्साह द्विगुणित
Aditya thackeray
“आजोबांची पूर्ण हयात…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर भाजपा नेत्याकडून प्रत्युत्तर, म्हणाले…
Yashomati Thakur on Navneet Rana
हे जातचोर आता फिरताहेत, खोटे आरोप करताहेत…; आमदार यशोमती ठाकूर यांची राणा दाम्‍पत्‍यावर टीका

हेही वाचा… फडणवीस, मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी; कट्टर विदर्भवादी बाबाराव मस्की यांच्यावर गुन्हा दाखल

हेही वाचा… बुलढाणा : मनोज जरांगे पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

ज्यांना कसलाच मोह राहिला नाही, ते म्हणजे मोहन भागवत, असे मत बंगळुरू येथील श्रुंगेरी महासंस्थानचे मठाधिपती विद्याविश्वेश्वर भारती शंकराचार्य महास्वामी महाराजांनी व्यक्त केले. सूर्य मावळताना आपले तेज शमी वृक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे प.पू. पंडितकाका धनागरे महाराजांनी त्यांचे तेज प.पू. विजयकाका पोफळी महाराज यांच्यात प्रतिष्ठापित केले, असेही महास्वामी म्हणाले. करवीर संकेश्वर पीठाचे दगदगुरू शंकराचार्य सच्चितानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी महाराज यांनी ५० चातुर्मास्य याग केले आहेत, अशी माहितीसुद्धा श्रुंगेरीच्या शंकराचार्यांनी यावेळी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India will be the global leader in future stated by rss chief mohan bhagwat pbk 85 asj

First published on: 21-11-2023 at 18:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×