Railways Jobs for 10th, 12th Candidates : Railway recruitment सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी बारावी आणि पदवीधरांसाठी ही मोठी संधी चालून आलेली आहे. अनेक वर्षांनंतर रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यावर्षी ३० हजारांवर जागांवर भरती होणार असणारे असल्याने अनेकांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून त्वरित कागदपत्रांची जुडवा जुडव करून अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरअरबी) द्वारे एनटीपीसी भरती २०२५ अंतर्गत ३०हजार पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती विविध पदांसाठी आहे. जसे की क्लर्क, स्टेशन मास्टर, गार्ड, टायपिस्ट, कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिस आणि इतर महत्त्वाच्या पदांसाठी होत आहे.
भारतीय रेल्वेमध्ये सेवा देण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया यासंबंधित सर्व तपशील खाली दिलेले आहेत. या जाहिरातीद्वारे लाखो उमेदवारांना भारतीय रेल्वेत स्थिर नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच भारतातील सर्व राज्यातील उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची प्रत तयार ठेवावी. ऑनलाईन अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार असून अनुसूचित जाती/जमाती व महिला उमेदवारांना सवलत देण्यात आली आहे. परीक्षेचे वेळापत्रक व अचूक तारखा लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर होतील. उमेदवारांना सुचवले जाते की शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज पूर्ण करावा.
संस्थेची माहिती
-संस्थेचे नाव रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड
-पोस्टचे नाव एनटीपीसी विविध पदे
-पदांची संख्या- ३०,३०७
-अर्ज सुरू होण्याची तारीख – ३०ऑगस्ट २०२५
-अर्जाची शेवटची तारीख – २९सप्टेंबर २०२५
-अर्जाची पद्धत ऑनलाईन
-श्रेणी गव्हर्मेंट जॉब
-नोकरीचे स्थान संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया कशी राहणार
सिबिटी १, सिबिटी २, टायपिंग स्कील, टेस्ट, आणि कागदपत्रांची पडताळणी. अर्ज करताना अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in यावर जाऊन अर्ज करता येणार आहे. क्लर्क, स्टेशन मास्टर, कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिस, गुड्स गार्ड, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट या पदांसाठी ही भरती होणार आहे. यात शैक्षणिक पात्रता म्हणजे उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा. काही पदांसाठी पदवीधर उमेदवार आवश्यक आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत व अर्ज शुल्क भरावे.