नागपूर : जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील २० टक्के म्हणजेच ७६२ स्कूलबस-स्कूलव्हॅनची शाळा सुरू झाल्यावरही योग्यता तपासणी झाली नसल्याचे पुढे आले. त्यामुळे आता १० जुलैपासून नियम मोडणाऱ्या या चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. नागपूर जिल्ह्यात ३ हजार ७५७ स्कूलबस-स्कूलव्हॅन नोंदणीकृत आहेत. त्यापैकी २ हजार ९९५ स्कूलबस-स्कूलव्हॅन चालकांनी योग्यता तपासणी केली. परंतु शाळा सुरू झाल्यावरही ७६२ बसची योग्यता तपासणी झाली नसल्याचे पुढे आले. त्यात शहर कार्यालयातील २८८, पूर्व नागपूर ३३५, नागपूर ग्रामीण कार्यालयातील १३९ बसेसचा समावेश आहे.

हेही वाचा – नागपूर : आपण रस्त्यावर पाणीपुरी खाता? मग या दगावलेल्या विद्यार्थिनीबाबत जाणून घा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरटीओकडून वारंवार आवाहन केल्यावरही चालक योग्यता तपासणी करत नसल्याने आता सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार-रविवारी तपासणीची एक संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही या चालकांनी तपासणी न केल्यास १० जुलैपासून कारवाईचा धडाका सुरू होणार आहे. क्षमतेहून जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे. पालकांनी स्कूलबस-स्कूलव्हॅनची कागदपत्रे बघूनच आपल्या मुलांना त्यात पाठवण्याचे आवाहन केले आहे. खासगी ट्रॅव्हल्समध्येही मालवाहतुकीसह इतर नियम मोडण्याच्या विषयावरही याप्रसंगी चर्चा झाली.