बुलढाणा: तब्बल ११५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या जगदंबा (शांती) उत्सवास रजतनगरी खामगावमध्ये पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला आहे. संपूर्ण देशात केवळ खामगाव येथे आयोजित या दहा दिवसीय उत्सवासाठी देशातील भाविक दर्शनासाठी येण्यास सुरुवात झाली आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर २८ ऑक्टोबरपासून उत्सवास प्रारंभ झाला. जलालपुरामध्ये मानाच्या मोठ्या देवीची विधिवत स्थापना करण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे २८ ऑक्टोबरच्या दुपारी ३ ते २९ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजेपर्यंत दर्शन बंद ठेवण्यात आले होते. हा उत्सव दहा दिवस चालतो. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी सत्यनारायण प्रसादाचे वितरण होईल. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जगदंबा मातेची आरती होऊन, विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. जगदंबा सार्वजनिक मोठी देवी उत्सव मंडळाचे विश्वस्त बळीराम सूर्यभान खंडारे यांनी ही माहिती दिली. या उत्सवात राज्यासह देशभरातून भाविक सहभागी होतात. यंदा ११७ मंडळांची स्थापना झाली. यामुळे खामगाव शहराला दहा दिवस यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

हेही वाचा – वर्धा : खरेदी विक्री संघात देशमुख गटाचा झेंडा

हेही वाचा – नागपूर : जागर शारदेचा, रंग मेहंदीचा, हजारो महिलांच्या हातांवर रेखाटणार मेहंदी, जाणून घ्या सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे इतिहास?

या मातेचे मूळ ठाणे आंध्रप्रदेशमधील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथे आहे. आंध्रप्रदेशमधून खामगाव येथे स्थायिक झालेल्या (दिवंगत) कैरना आनंदे यांनी प्रथम देवीची स्थापना केली. १९०८ मध्ये ही स्थापना झाली.