नागपूर : नव्यानेच शहर पोलीस आयुक्त हद्दीत आलेल्या खापरखेडात ११ वर्षीय जित युगराज सोनेकर याचे अपहरण करून खून केल्याची संतापजनक घटना बुधवारी उघडकीस आली. खापरखेडा परिसरातील चनकापूर येथे ही घटना घडली. खंडणीसाठी हा खून झाल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहूल गौरीलाल पाल (२५), अरुण बैचू भारती आणि यश गिरीश वर्मा या तीन मारेकऱ्यांना अटर केली आहे.

युगराज आणि निलीमा सोनेकर यांचा मुलगा जित या खापरखेडा परिसरात चनकापूर कॉलनीतल्या प्रकाश नगर येथील शंकरराव चव्हाण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. मात्र सायंकाळपर्यंत जित घरी न आल्याने त्याची आई निलीमा यांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. त्यांनी बसस्थानकावरू तिन जणांनी जित ला कारमध्ये बसवून नेल्याचे निलीमा यांना सांगितले. खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी अपहरणाची शक्यता पाहता सीसीटीव्ही फुटेत तपासले. यात पांढऱ्या रंगाच्या कारमधून जितचे अपहरण झाल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. दरम्यान चनकापूर हद्दीतील झुडपात गुराख्याला शाळेच्या गणवेशाच एका मुलाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकणात टीम पाठवून तपासणी केली. हा मृतदेह जितचाच असल्याचे आढळले. त्याचा गळा आवळला गेला असेही सक्रतदर्शनी आढळले.

खंडणीसाठी अपहरण – खून

जितचे वडील युगराज यांची मध्य प्रदेशातील पांढूर्णा येथे शेती आहे. अलिकडेच झालेल्या व्यवहारातून युगराजकडे पैसा आल्याचा संशय युगराजचा मित्र सूत्रधार राहूल पाल याला आला होता. यातूनच पालने अरुण आणि गिरीशच्या मदतीने युगराजचा मुलगा जित याच्या अहरणाचा कट रचला. जित हा राहुलला ओळखत असल्याने तिघांनी भानेगाव बसस्थानकावरून त्याला अरुण भारतीच्या कारमध्ये बसवले. तेथून सिल्लेवाडी परिसरात नेऊन तिघांनी जितचा गळा आवळून खून केला. त्यानंतर जितचा मृतदेह चनकापूर भागात झुडपात आणून टाकला. जितच्या वडीलांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी तिघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली.