नागपूर : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभ्रमण केले, याचे कौतुकच आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुराव्यांअभावी टीका करणे, त्यांची निंदा करणे अगदी चुकीचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग यांनी व्यक्त केले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – अवकाळी पावसाने पीक हानी, फडणवीस म्हणाले…

हेही वाचा – यवतमाळ : शिर्डीच्या साई संस्थानकडून ‘एमआरआय’ मशीन खरेदीसाठी १३ कोटींची मदत, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभद्र भाषेच्या वापरासाठी सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही समान जबाबदार आहेत. राजकारण्यांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा सवाल साहित्यिकांनी राजकारण्यांना विचारावा, असा सल्ला जोग यांनी दिला. जोग यांच्या व्यक्तव्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही लगेच उत्तर दिले. जोग यांचे विचार मार्क्सवादी आहेत तरी त्यांचे सावरकरांवर प्रेम का आहे? याचे कोडे कुणालाही उलगडले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेले विधान अऐतिहासिक नाही असे नव्हे तर ते लोकप्रिय नसल्याने आपल्याला मान्य नाही आहेत. विज्ञानाचे पुरस्कर्ते सावरकर हिंदुत्ववाद्यांना मान्य का नाही, असा खोचक सवालही जोशी यांनी कार्यक्रमात विचारला.