नागपूर :  बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांपैकी एक व जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्याचा नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. सकरू महाबू बिंजेवार (६१) रा. खैरलांजी, मोहाडी, भंडारा असे मृताचे नाव आहे.

खैरलांजी हत्याकांड प्रकरणी सुरुवातीला जिल्हा न्यायालयात १५ सप्टेंबर २००८ रोजी ज्या आठ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यात सकरूचेही नाव होते. पुढे उच्च न्यायालयात सहा जणांची फाशी रद्द करून त्यांना २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यात सकरू होता. तो कारागृहात शिक्षा भोगत असताना ७ एप्रिल रोजी  प्रकृती अस्वस्थामुळे त्याला मेडिकल येथे दाखल करण्यात आले. त्याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणातील दोन दोषींचा कारागृहात मृत्यू झाला आहे. यात सकरू आणि अन्य एक दोषी विश्वनाथ  धांडेचा समावेश आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याचाही मृत्यू प्रकृती अस्वास्थामुळेच झाला होता