नागपूर : अंगनातून ८ वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. काळजाचा तुकडा दिसत नसल्यामुळे आई सैरभैर झाली. दोन दिवस उलटले तरी मुलाचा पत्ता नाही. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शोध सुरू होता.

हळव्या मनाच्या आईच्या मनात बऱ्याच शंका-कुशंकाने घर केले होते. घरासमोर डोक्यावर हात देऊन बसलेल्या मातेला अंगनात तीन पोलीस कर्मचारी दिसतात आणि त्यांच्या कडेवर तिचा मुलगा दिसतो. हरणीसारखी झेप घेऊन ती आई मुलाला बिलगते. एका मजूर असलेल्या रमेश नावाच्या व्यक्तीने वाट चुकलेल्या मुलाला पोलीस ठाण्यात आणून दिल्याचे समजताच मातेने त्या व्यक्तीच्या पायावर डोके टेकवले आणि त्याचे मनापासून आभार मानले. त्याच रमेशचा तीन पोलीस उपायुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

हेही वाचा – वर्धा : अचानक गडकरींमधला ‘आरटीओ’ जागा झाला अन…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोलमजुरी करणारे कोटांगळे दाम्पत्य राहतात. त्यांना अंश नावाचा ८ वर्षांचा एकुलता मुलगा आहे. १९ मे रोजी अंश हा अंगनात खेळत होता. त्याची आई घरात काम करीत होती. मुलाला बोलवायला बाहेर आलेल्या आईला मुलगा दिसला नाही. त्यामुळे तिने आजुबाजूला शोधाशोध केली. कुणासोबत गेला असेल म्हणून ती सायंकाळपर्यंत वाट बघत होती.

मात्र, रात्र झाली तरी मुलगा दिसत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या कोटांगळे दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला. काही नातेवाईकांसह ते मुलाला शोधायला निघाले. त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वायरलेसवरून बीट मार्शल, डीबी पथक, मिसींग पथक, एएचटीयू पथक आणि वरिष्ठांना मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मुलाचा शोध लागला नाही. रमेश साहू (५५, गिट्टीखदान) नावाच्या मजुराला मुलगा एका झाडाखाली झोपलेला दिसला. मुलगा भूकेने व्याकुळ झाला होता. उपाशी असल्याने तोंडातून शब्दही फुटत नव्हता. रमेश यांनी मुलाला खायला बिस्किट आणि पाणी दिले. रस्ता चुकल्यामुळे घर शोधता येत नव्हते आणि कुणी मदतही करीत नव्हते. खूप पायी चालल्याने थकून झाडाखालीच झोप लागल्याचे मुलाने सांगितले.

हेही वाचा – नागपूर : तापमान वाढीसह पावसाचेही ढग; ‘नवतपा’तील चटके सुसह्य की..

रमेश यांनी त्या मुलाला दुचाकीवर बसवले आणि थेट गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नेले. गिट्टीखदानचे उपनिरीक्षक अशोक हाटकर, एएचटीयू पथकाच्या रेखा संकपाळ, पोलीस दीदी उपक्रमाच्या कर्मचारी वैशाली, रिता, सलीता यांनी बेपत्ता मुलाला आईकडे सोपवले.

रमेश यांचा केला सत्कार

एका बेपत्ता झालेल्या मुलाला शोधण्यास महत्त्वाची भूमिका निभावणे, मुलाची आस्थेने विचारपूस करून त्याला सुखरूप पोलीस ठाण्यात आणणे अशी दुहेरी भूमिका निभावणाऱ्या रमेश साहू यांचा पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, उपायुक्त राहुल मदने आणि उपायुक्त गोरख भामरे यांनी शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही रमेश यांना शुभेच्छा दिल्या. सामान्य नागरिकांच्या मदतीमुळे पोलिसांनी यश मिळाल्याची भावना उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी व्यक्त केली.