लोकसत्ता टीम

नागपूर : पोळ्यानिमित्त १४ सप्टेंबरला जाहीर झालेली सुटी आता विभागीय आयुक्तांनी सुधारित आदेश काढून ती पाडव्याला म्हणजे १५ तारखेला केली आहे. वरवर हा प्रशासकीय बदल दर्शवण्याचा प्रयत्न झाला. पण नंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या पत्राने या सुटीबदला मागे राजकीय हस्तक्षेप असल्याचे उघड झाले.

झाले असे, शासनाच्या निर्णयानुसार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागपूर जिल्ह्यांसाठी पूर्वी तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या होत्या. त्यानुसार १४ सप्टेंबरला पोळ्याची सुटी होती. मात्र, गुरूवारी आयुक्तांनी सुधारित आदेश जारी केला. त्यानुसार १५ सप्टेंबरला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी (पाडवा) सुटी जाहीर करण्यात आली. हा बदल प्रशासकीय पातळीवर झाला असावा, असे समजून याबाबत कोणीच काही बोलले नाही. पण हा बदल प्रशासकीय नव्हताच. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विभागीय आयुक्तांना सुटीबदलाची विनंती केली होती. त्यासाठी एका बड्या नेत्यांनी फोनही केला होता, असे नंतर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट झाले.

आणखी वाचा-Dahi Handi 2023: ‘येथे’ आठवडाभर चालतो सिनेतारकांच्‍या हजेरीत दहीहंडीचा जल्लोष; जाणून घ्‍या सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूरमध्ये पोळ्याच्या पाडव्याला मारबत काढली जाते. त्यामध्ये लाखो नागपूरकर सहभागी होतात. यंदा १५ सप्टेंबरला पाडवा आहे. परंतु विभागीय आयुक्तांनी यांनी यापूर्वी १४ सप्टेंबरला सुटी जाहीर केली होती.त्यामुळे यंदाही पाडव्याला म्हणजे १५ सप्टेंबरला सुटी द्यावी, अशी विनंती भाजपकडून विभागीय आयुक्तांना करण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी सुधारित आदेश काढले, असे खोपडे यांनी कळवले आहे.