वाशीम : ग्लोबल वार्मींगमुळे पर्यावरणाचा झपाट्याने -हास होत आहे. बदलेले ऋतुचक्र, तापमानात झालेला बदल, अवकाळी, पाऊस, गारपीट आदी समस्या समोर येत आहेत. हे नैसर्गिक संकटे दूर करायचे असेल तर वृक्ष लागवड व संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे. ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन एसएमसी  इंग्लिश स्कूल येथील इयत्ता ७ व्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकल्या अक्षरा विजयसिंग देशमुख हिने वेगवेगळ्या जातीच्या तब्बल १ हजार वृक्षांच्या बिया गोळा केल्या. त्याचे काही संच सामाजिक वनीकरण व शाळेच्या प्रांगणात लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> शालेय पोषण आहार तयार करणारे स्वयंपाकी होणार आता तरबेज ‘शेफ’; मानधनासह मिळणार खास प्रशिक्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या हरित सेनेच्या उपक्रमातुन प्रेरणा घेत अक्षराने हा छंद जोपासला. विदर्भातील शहरी, ग्रामीण भाग आणि राना वनात पूर्वी विविध प्रकारचे वृक्ष राहायचे. मात्र, गेल्या काही दशकात या वृक्षांची अमाप कत्तल  होत असल्याने ग्लोबल वॉर्मिगचा प्रश्र्न निर्माण होत आहे. एस एम सी इंग्लिश स्कूलने महाराष्ट्र शासनाच्या हरित सेना उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत जोशी यांनी हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून पर्यावरण संवर्धनाशी निगडीत   विविध उपक्रम राबवित आहेत.