नागपूर : कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन संचाबाबत सोमवारी जनसुनावणी झाली. यावेळी बहुसंख्य स्थानिक नागरिकांसह १३ ग्रामपंचायतींनी प्रकल्पाला समर्थन दिले. परंतु पर्यावरणवादी, काँग्रेस, आप, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मात्र प्रकल्पाला विरोध केला.

नागपूरजवळील कोराडीत ६६० मेगावॅटचे २ संच कार्यान्वित करण्याचे महानिर्मितीकडून प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबाबत सोमवारी महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्प परिसरात सुनावणी झाली. सुनावणीत अपवाद सोडले तर बहुसंख्य नागरिकांनी रोजगार मिळणार असल्याचे सांगत प्रकल्पाला समर्थन जाहीर केले. या काँग्रेस पक्षातर्फे राज्य महासचिव विशाल मुत्तेमवार, राज्य सचिव संदेश सिंघलकर यांनी प्रकल्पाला विरोध केला व नियम धाब्यावर बसवल्याचे सांगत सुनावणी रद्द करण्याची मागणी झाली. प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा अद्यापही १०० टक्के वापर प्रकल्पात होत नाही.

Residents of Santacruz and Khar, Residents of Santacruz and Khar Oppose bmc's Elevated Route, BMC Administration to Study Citizens Instructions, Santacruz, Khar, khar subway, Santacruz news, khar news, Santacruz Khar Elevated Route,
खार सब वेवरील उन्नत मार्ग प्रकल्प रद्द होणार ? नागरिकांच्या सूचनांचा प्रशासन अभ्यास करणार
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी

हेही वाचा >>> प्रेयसीच्या भावाचा फोन आला अन् घोळ झाला; मारहाणीच्या भीतीने अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे पलायन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला यापूर्वी एफजीडी लावण्यासोबतच प्रदूषणाबाबत दिलेले एकही आश्वासन पूर्ण करण्यात आले नसल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनीही पूर्वीचे प्रदूषण नियंत्रित झाल्यावरच नवीन प्रकल्पाला समर्थनाची भूमिका घेतली. शिवसेनाच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनीही प्रकल्पाला विरोध केला. कोराडी नागपूर हवामान संकट ग्रुपमधील विविध पर्यावरणवादी संघटना, नागरिकांनी विविध अहवालांचा दाखला देत प्रकल्पाला कडाडून विरोध केला. विरोध करणाऱ्यांत नितीन रोंघे, लीना बुद्धे, दिनेश नायडू यांच्यासह अनेकांचा समावेश होता. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकल्पाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : एमडी तस्करीची भीती दाखवून डॉक्टरची ३ लाखांनी फसवणूक; गुन्हा दाखल

भाजप नेत्याकडून पारशिवनीत प्रकल्पाची मागणी

भाजपचे माजी आमदार व नेते मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले, शहराला लागून असलेला हा प्रकल्प प्रदूषणाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे तो पारशिवनीत उभारण्याची मागणी त्यांनी केली. कोराडीतील या प्रकल्पामुळे बऱ्याच गावात कोळसा वाहतुकीमुळे ध्वनी, वायू प्रदूषणाची गंभीर समस्या असल्याचा दाखला त्यांनी दिला.