Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Updates Today : नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. आज ( २९ नोव्हेंबर ) विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रकल्प, सीमाप्रश्न, महापुरुषांचा अवमान, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि विदर्भाचं अनुशेष यावरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं जाण्याची शक्यता आहे.
Assembly Winter Session 2022 Live Updates, 29 December 2022 : हिवाळी अधिवेशनाच्या आज पुन्हा सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार?
विधानसभेत शिवसेना आमदार ( ठाकरे गट ) भास्कर जाधव यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत एक प्रश्न उपस्थित केला. यावर आक्षेप घेत भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष्य केलं. सभागृहासमोर तो विषय नसताना कोणीही बोलायचं. यामुळे तुमच्या कारकिर्दीला डाग लागणार आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी समाचार घेतला. "मुंबईचे महत्व उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुंबईसाठी १०६ जणांनी हुतात्म पत्करलं आहे. मुंबईबद्दल ५ वेळा राज्यपालांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केलं. 'गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईच्या बाहेर काढलं तर पैसा उरणार नाही, असं राज्यापलांच्या वक्तव्याचा दाखला देत अजित पवार म्हणाले, ' वारे पठ्ठे' ही भाषा राज्यपाल महोदयांची आहे. पण, कशासाठी असे बोलत आहात," असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विदर्भाच्या प्रश्नावरून आज ( २९ डिसेंबर ) विधानपरिषदेमध्ये आक्रमक शैलीत भाषण करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. नितीन गडकरी सोडले तर विदर्भात आहे काय. तीनवेळा गोसेखुर्दचे उद्घाटन झाले, पण प्रकल्प काही समोर सरकत नव्हता. नितीन गडकरींच्या पुढाकराने प्रकल्प मार्गी लागला, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.
"समृद्धी महामार्गाने कोणा कोणाची समृद्धी झाली, प्रत्येकाने अंर्तमनाने विचारवं कोणा कोणाची समृद्धी झाली. पण, नागपूर-गोवा महामार्ग करत असताना, गोवा-मुंबई २०११ साली कामाला सुरुवात झाली. तेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं. २०१४ पासून मोदी सरकार सत्तेत आलं. तरीही सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीतील लोकांना वाईट वाटतं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष घालावे," अशी मागणी अजित पवारांनी केली.
"गेली दोन वर्षे विदर्भात अधिवेशन झालं पाहिजे, अशी मागणी करण्यात येत होती. सरकार बदललं नसते तर विदर्भात अधिवेशन झालं नसते. चीन, कोरीया आणि जपानमध्ये वाढत्या रुग्णांचा निकष इकडे लावला असता. अजित पवारांना माहिती, लॉकडाऊन आणि करोना कोणाच्या आवडीचा विषय आहे," असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
अजित पवार यांचं भाषण नेहमीच रोखठोक असतं. पण, यंदा १०० टक्के भाषण अजित पवारांचं वाटत नव्हते. ५० टक्के जयंत पाटील यांचही होतं. जयंत पाटील सभागृहात नसल्याने अर्ध भाषण लिहून दिलं, असा भास तुमच्या भाषणातून होत होता. वीज तोडण्याचा जीआर मी ट्वीट देखील केला. फेसबुकर टाकला आणि सगळ्यांना पाठवला देखील, तरीही तुम्हाला कसं काय सापडला नाही. त्यामुळे दादा तुम्ही मला आता ट्वीटरवर फॉलो करा, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना लगावला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गायरान जमीन घोटाळ्यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. "गायरान जमीन कोणालाच देता येणार नाही, असा कायदा झाला आहे. कायदा मोडणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना सभागृहात बसता येणार नाही. कायदा २०११ मध्ये झाला आहे. शासनाने २०११ साली परिपत्रक काढलं आहे. हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलं आहे. त्यांचा राजीनामा घ्यायला हवा," असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशन या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. २३ कॉनट्रॅक्टर काळ्यायादीत टाकण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या मुलांना काम भेटले आहेत. हे सर्व उबाळे नावाच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत झालं आहे. विभागीय उपायुक्तांकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याला निलंबीत करणार का?, असा सवाल भाजपा आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला.
आजच्या दिवशी कोणत्या ठराव, प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार?