गोसीखुर्द प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा, भूसंपादनाची कामे तात्काळ पूर्ण करून सिंचनातून कृषी व पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पवनी व ब्रम्हपुरी येथे गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव अजय मेहता यांच्यासहित अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांनी ब्रम्हपुरी येथे घोडाझरी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळच बैठक घेवून प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेतली. तसंच गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेली कामं, या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेला सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray chandrapur gosikhurd project sgy
First published on: 08-01-2021 at 16:15 IST