बुलढाणा : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी मलकापूर न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश एस. व्ही. जाधव यांनी सोमवारी, ९ डिसेंबर रोजी हा निकाल दिला. पीडितेची डीएनए चाचणी निकालात निर्णायक घटक ठरली. मलकापुर येथील एका अल्पवयीन मुलीला किसना यादव सोनोने तसेच अमोल समाधान वानखेडे (राहणार मलकापूर) या दोघांनी त्यांचे घरी बोलावून लैगिक अत्याचार केला. त्यामधून ती गर्भवती राहिली. सदर घटनेबाबत पिडितेने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोषारोपपत्र विशेष न्यायालय मलकापूररयेथे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा…टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’

आरोपी किसना यादव सोनोने हा प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान फरार झाला. आरोपी अमोल समाधान वानखेडे याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यास न्यायालयीन बंदी ठेवून सदरचे प्रकरणपुढ चालवण्यात आले. आरोपी अमोल समाधान वानखेडे यांचेविरूद्ध सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी तसेच डी.एन.ए. तज्ञ, व तपास अधिकारी यांचे पुराव्यानंतर आरोपी अमोल समाधान वानखेडे याचे विरूद्ध गुन्हा सिद्ध झाला.अंतिम सुनावणी होवून सरकार पक्षातर्फे शैलेश जोशी विशेष सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरण्यात आला.आरोपी अमोल समाधान वानखेडे यास अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ६ सहवाचनिय कलम ५(जे) (ii)आणि ५ (१) नुसार जन्मठेप म्हणजेच उर्वरीत आयुष्य आहे तो पर्यंत शिक्षा तसेच २५ हजार रुपये दंड , दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त

मजुरी तसेच कलम ४(२) पोक्सो कायद्‌यानुसार जन्मठेप व २५ हजार दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त मजुरी तसेच कलम ३२३ भा.दं. वि.नुसार १ वर्षे शिक्षा तसेच कलम ५०६ भा.दं. वि. नुसार १वर्ष शिक्षा आरोपीस सुनावली आहे.

हेही वाचा…विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

अमोल वानखेडे यांचेकडून ५० हजार रूपये दंड वसुल झाल्यानंतर सदर रक्क्म पिडीतेस देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे .तसेच सामाजिक न्याय विभागा मार्फत देण्यात येणाऱ्या पिडीत नुकसान भरपाई योजनेअंतर्गत सुद्धा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण बुलढाणा यांना अतिरीक्त नुकसान भरपाई ठरवून पिडीतेस देण्याबाबत सुद्धा आदेश देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरणाचा तपास मलकापूर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी केला होता. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक संतोष भिकाजी कोल्हे यांनी काम पाहिले. पिडीतेतर्फे अॅड. विशाल गोविंदा इंगळे यांनी सरकार पक्षास मदत केली.