चंद्रपूर : वाघाने पतीसमोरच पत्नीवर हल्ला केला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बल्लारपूर शहरालगतच्या नाल्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. लालबच्ची चौहान (६०) असे मृत महिलेचे नाव आहे. बल्लारपूरातील दिनदयाल वॉर्डातील रहिवासी रामअवध चौहान हे पत्नी लालबच्ची चौहान हिच्यासोबत बकऱ्या चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते.

हेही वाचा >>> नागपूर: इतवारी रेल्वे स्थानकाचे नामकरण आता या नावाने ओळखले जाणार

Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 
Textile Mill Workers, Transit Camps, Hazardous Building, Issue Persists, shivadi, byculla, lalbaug, parel,
संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला

बकऱ्या चारत असताना लालबच्ची चौहान या चारा गोळा करण्यासाठी झुडुपात गेल्या असता तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही बाब पती रामअवध चौहान यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. जवळपास असलेले नागरिक मदतीला धावून आल्याने वाघाने पळ काढला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जंगल परिसरात नागरिकांनी जावू नये, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र भोवरे यांनी केले आहे.