अमरावती : बगिचात खेळण्‍यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलींना जवळ बसवून त्यांना पॉर्न व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत व्‍यक्‍तीला बेदम चोप देण्यात आल्‍याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत उघडकीस आली आहे. दोन महिलांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले.

मनोज मोहन मेश्राम (४५, रा. उपराई, ता. दर्यापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला अटक करण्‍यात आली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी तिच्या बहिणीच्या दोन अल्पवयीन मुली पाहूणपणाने आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी उद्यानात खेळायला जाण्याचा आग्रह धरला. शुक्रवारी २६ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या दोन्ही अल्पवयीन मुली खेळत होत्या. त्यावेळी तेथील एका बेंचवर बसलेल्या आरोपीने त्या दोघींपैकी एकीला जवळ बोलावले. त्याने त्याच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ त्या मुलीला दाखविला. ती मुलगी बेंचवर बसली असताना त्या विकृताने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ती बाब त्या मुलींनी मावशीला सांगितली.

हेही वाचा – नागपूर : शिवराज्याभिषेक सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलींनी ती बाब सांगताच तिच्या मावशीने दोन- तीनदा त्या गार्डनला जाऊन त्या विकृताचा शोध घेतला. मात्र, तो दिसला नाही. दरम्यान दुपारी पुन्हा त्या मुली त्याच गार्डनमध्ये गेल्या. तेव्हा तो विकृत त्यांना दिसून आला. मुलींनी आपल्याबाबत महिलांना काहीतरी सांगितले, असे लक्षात येताच आरोपीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रत्यक्षदर्शी व वाहनधारकांनी त्याला तेथेच पकडले. त्याला चोपदेखील देण्यात आला. त्यानंतर त्याला पकडून गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.