नागपूर : गर्भात वाढलेले बाळ जन्मताच ते दगवण्याचा प्रसंग शत्रुवरही ओढवला जाऊ नये, इतकी ही घटना संवेदनशील असते. मात्र, संभावित धोका माहित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे, हे पापच आहे आणि हेच पाप कमलापूरच्या शासकीय हत्ती कॅम्पमधील हत्तींकडे दुर्लक्ष करुन झाले आहे.

हेही वाचा… गोंदियातील बिरसी विमानतळ प्राधिकरणावर २.७ कोटींचा कर थकीत

हेही वाचा… आज आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन; महिलांचा लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा नवा धडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भामरागड, सिरोंचा क्षेत्रात कार्य कारणाऱ्या जनसंघर्ष समितीने कमलापूर हत्ती कॅम्प साठी विशेष पशुवैद्यकीय चिकित्सक नेमण्याची मागणी वेळोवेळी केली होती. येथे असलेल्या ‘मंगला’ ही हत्ती गर्भवती असल्याने संबंधित वन अधिकाऱ्यांची भेट घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याबाबत आग्रह धरला होता. मात्र, बघू, विचारू अशीच उत्तरे वनाधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती. येथील कळपाच्या आरोग्यासाठी महिन्या दोन महिन्यातून पशू वैद्यकिय अधिकारी नागपुरातून येतो, तपासणी व जुजबी उपचार करतो आणि परत निघून जातो. सोमवारी, २६ फेब्रुवारी ला मंगला प्रसूत झाली. पण, तिचे पिल्लू जास्त काळ जगू शकले नाही. आपले पिल्लू उठत का नाही, हालचाल का करत नाही. यामूळे ‘मंगला’ कासावीस झाली. यावेळी तिचा आक्रोश साऱ्या कमलापूरवासियांना थरारून सोडणारा होता. मंगलाची प्रसूती जवळ आली असतानाही येथे पशुवैद्यकीय अधिकारी नसणे हा बेजबाबदारपणा आहे. येथे नियमित चिकित्सकाची नियुक्ती असती तर आज ‘मंगला’चे पिल्लू जगले असते आणि कमलापूर पुन्हा आनंदाने फुलले असते. मात्र, सध्या दुःखाच्या सावटात आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी जनसंघर्ष समितीचे दत्ता शिर्के यांनी केली आहे.