भंडारा : Nagpur Dahi Handi 2023 दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे भव्यदिव्य असे आयोजन दसरा मैदान येथे आज करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले असून दहीहंडी फोडताना गोविंदा दहीहंडी बांधलेल्या दोराला लटकल्याने दोर बांधलेला एक लाकडी स्तंभ अचानक कोसळला. त्यामुळे घटनास्थळी एकाच  गोंधळ उडाला. लाकडी स्तंभ कोसळून तो उपस्थित गोविंदांच्या अंगावर पडणार तोच पळापळ झाली. मात्र यात ६ गोविंदा जखमी तर १ गोंविदा फ़ैक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार भोंडेकर यांच्या वतीने आयोजित दहीहांडीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. दहीहंडीच्या या कार्यक्रमासाठी ३ दिवसांपासून जय्यत तयारी करणे सुरू होते. दहीहंडी बांधण्यासाठी अंदाजे ५० फुटावर दोर बांधलेला होता. त्यासाठी दोन्ही बाजूंनी लाकडी स्तंभ उभारण्यात आले. मात्र आज सायंकाळी ८ .३० वाजताच्या सुमारास एक लाकडी स्तंभ अचानक कोसळल्याने या ठिकाणी गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही काळजी घेण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा >>> “महायुतीत सहभागी होण्यासाठी…”, अजित पवारांचा शरद पवारांवर मोठा आरोप

मुळात सायंकाळी सुरू होणारा कार्यक्रम पाहुण्याच्या उशिरा आगमनाने बराच उशिरा सुरू झाला. त्यात पावसामुळे मैदानात पूर्णतः चिखल झालेला होता. असे असताना यात सहभागी होणाऱ्या गोविंदांची काळजी आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. मात्र याकडे आयोजकांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे आजच्या घटनेवरून सिध्द होते.  या घटनेत भंडारा नशा मुक्ति पथकाचे ६  गोविंदा जखमी झाले असून १ गोविंदा फ्रेक्चर झाल्याची माहिती आहे. भंडारा शहरातील दसरा मैदान येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रम सुरु असताना उभारण्यात आलेल्या लाकडी दोन्ही लाकडी स्तंभावर जाड दोरखंड, त्याला फुलांच्या माळा लावण्यात आल्या. मधोमध दहीहंडी लावण्यात आली होती. तसेच त्यावर हायलोजन लाईट  सुद्धा लावण्यात आले होते.

हेही वाचा >>> मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, नागपुरात आंदोलन सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दोन गोंविंदा पथका मिळून पाच ते सहा थर  लावण्यात आले असताना गाण्यावर सर्वजण थिरकत असताना, स्टेजच्या उजव्या बाजुचा लाकडी स्तंभ अचानक गोंविंदा पथकांच्या अंगावर कोसळल्याने, काही गोविंदा जखमी झालेत, त्यांना अँम्बुलंन्सनी दवाखाण्यात नेण्याचे अनाउंसमेंट करण्यात आले. सुदैवाने जिवितहाणी टळली असली तरी, प्रसंगी आयोजक व पोलिस प्रशासन आणि उपस्थितांची तारांबल उडाल्याचे दृश्य होते. दरम्यान आयोजकांनी प्रोग्राम थांबविला व कार्यक्रम सपल्याचे सांगण्यात आले. घटना रात्री ८.२५ वाजताला घडली असुन दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.