नागपूर : व्यसनी मुलाने आईला मोबाईल मागितल्यावर तो देण्यास नकार दिल्याने तिचा रुमालाने गळा आवळून खून केला. हुडकेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री संत गजानन महाराज नगरात ही घटना घडली.

रामनाथ गुलाबराव बडवाईक (२८) असे आरोपी मुलाचे नाव असून कमला गुलाबराव बडवाईक (४७) असे मृतक आईचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कमला यांना तीन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा पत्नीसह मध्य प्रदेशात राहतो. लहान मुलगा दीपक हा आपल्या पत्नीसह मनिषनगरात राहतो. रामनाथ हा व्यसनी असल्याने तो आईसोबत श्री संत गजानन महाराज नगरात राहतो. रामनाथ याच्या वडिलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. दरम्यान बुधवारी (ता.१८) सायंकाळच्या सुमारास रामनाथ घरी आला. त्याने आईला मोबाईल मागितला. मात्र, आईने त्याला स्वतःचा मोबाईल गांजा आणि दारूसाठी विकला असल्याने आपला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रागाच्या भारात तिला ढकलले आणि ती खाली पडताच, खिशातून रुमाल काढून तिचा खून केला. दरम्यान नातेवाईकांसह भावांना आईची प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, लहान भाऊ दीपक याला संशय आल्याने त्याने याबाबत हुडकेश्‍वर पोलिसांना गुरुवारी माहिती दिली.

हेही वाचा – नमो ११ ! ‘या’ पालिकांचे होणार सौंदर्यीकरण व आरोग्यसंवर्धन

हेही वाचा – वर्धा : बेपत्ता विवाहितेस विकण्याचा डाव, बिहारमधून घेतले ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी कमला यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या अहवालात गळा आवळून खून केल्याची माहिती समोर येताच, रामनाथ याला अटक केली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली.