नागपूरची आंतरराष्ट्रीय मास्टर मृदुल डेहनकरने आंतरराष्ट्रीय महिला ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. गुजरात येथे महिलांच्या खुल्या गटात सुवर्णपदक जिंकणारी मृदुल ही दिव्या देशमुखनंतर नागपूरची दुसरी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.

गुजरात राज्य बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित व राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत मृदुलने अकरा फे ऱ्यांमध्ये सर्वाधिक आठ गुण नोंदवले. अकराव्या मानांकित मृदुलने स्पर्धेत सात विजय नोंदवले, तर दोन सामन्यांत तिला पराभव पत्करावा लागला. उरलेले दोन सामने बरोबरीत राखले. पहिल्या फे रीत व्हिएतनामच्या लूंग फूंग हानकडून पराभूत झाल्यानंतर मृदुलने दुसऱ्या फे रीत उझबेकिस्तानच्या कु रबोनबोएव्हा, मंगोलियाच्या एंथूल अलतान उलझील व भारताच्या तनिष्का कोटियावर लागोपाठ तीन विजय नोंदवून जोरदार पुनरागमन के ले. पाचव्या फे रीत व्हिएतनामची महिला ग्रॅन्डमास्टर गुएल थी माईला बरोबरीत रोखल्यानंतर मृदुलने पुन्हा भारताच्या हर्षिनी व प्रत्युषाविरुद्ध सलग दोन विजय नोंदवले. आठव्या फे रीत भारताच्याच प्रियांकाविरुद्ध पराभव व नवव्या फे रीत युक्रे नची महिला ग्रॅण्डमास्टर बेबी ओल्गाविरुद्ध बरोबरीनंतर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवून मृदुलने विजेतेपदावर शिक्कामोर्तब के ले. विजेतेपदाबद्दल मृदुलला आकर्षक ट्रॉफीसह रोख १ लाख ६० हजार रुपये मिळाले. स्पर्धेत पाच महिला ग्रॅण्डमास्टर्ससह देशविदेशातील बारा बुद्धिबळपटू सहभागी झाल्या होत्या. मृदुलचे गेल्या दोन महिन्यातील हे दुसरे विजेतेपद होय. सप्टेंबरमध्ये तिने आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्?यपद मिळवले होते. मृदुल राष्ट्रीय बुद्धिबळपटू गुरप्रीतसिंग मरासच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.