scorecardresearch

नागपूर : प्रेयसीवर बलात्कार करून खून

ही थरारक घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात उघडकीस आली.

Dead Body
प्रतिनिधिक छायाचित्र

इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या प्रियकराने आधी प्रेयसीला जंगलात नेऊन बलात्कार केला व त्यानंतर दुसऱ्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिची धारदार चाकूने हत्या केली. ही थरारक घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा परिसरात उघडकीस आली. धीरज सुरेश शेंडे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृृत प्रेयसी १५ वर्षांची होती.  तिचे आई- वडील मजूर असून ती    २१ जूनला सकाळी नेहमीप्रमाणे शिकवणी वर्गाला गेली. मात्र अकरा वाजेपर्यंत परत न आल्याने  आई-वडिलांनी शिकवणी वर्गात चौकशी केली. ती निघून गेल्याचे कळताच त्यांनी मैत्रिणीकडे शोध घेतला. ती धीरज शेंडे या युवकाच्या दुचाकीवर गेल्याचे एका मैत्रिणीने सांगितले. त्यामुळे दोघांचाही कुटुंबीयांनी शोध घेतला. परंतु, ते मिळून आले नाही. अखेर मुलीच्या हत्येची माहितीच कळली.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder rape girlfriend instagram district mauda complex police crime amy

ताज्या बातम्या