नागपूर : अपेक्षित मालमत्ता कर आकारणी झाली नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ३० जूनपर्यंत जमा करणाऱ्या मालमत्ता करधारकास १५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरातील अनेक नागरिकांना मालमत्ता देयके पोहचले नसताना महापालिका प्रशासनाने दंडासहित अनेक नागरिकांकडून करवसुली सुरू केली होती. यासंदर्भात नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने मालमत्ता धारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त जे भरतील त्यांना १५ टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे या सुविधेचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करून चालु वर्षातील कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १५ मे पासून; परीक्षा अर्जाची मुदत ६ मे पर्यंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 योजनेबाबत माहिती देताना उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले, की ३० जून २०२३ पूर्वी चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर रक्कम नागपूर महापालिका निधीत जमा केल्यास एकूण १५ टक्के सूट दिली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची आगाऊ रक्कम नागपूर महापालिका निधीत जमा केल्यास १० टक्के सूट आणि ऑनलाईन सुविधेचा वापर करून चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम जमा केल्यास ५ टक्के सूट असे एकूण १५ टक्के सूट चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कर रकमेत दिली जाणार आहे.