नागपूर : घरासमोर खेळत असताना विजेच्या खांबावरील तारांचा धक्का लागल्याने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कळमना परिसरात उघडकीस आली. कुंदन विजय शाहू (९, रा. विजयनगर, कळमना) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा : नागरिकांना शर्ट, टोपी, सॉक्स काढायला लावले… काय आहे कारण ?

हेही वाचा – नाना पटोले हे शरद पवार, उद्धव ठाकरेंसमोर बोलू शकत नाही, अशोक चव्हाण यांची टीका; म्हणाले, “स्वप्नांवर पाणी टाकले…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शाहू हे मूळचे मध्यप्रदेशचे असून कुटुंबीयांसह कळमन्यात राहतात. त्यांना सहा वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा कुंदन नावाचा एकुलता मुलगा होता. तो चौथीत शिकायचा. त्याचे आईवडील मजुरी करतात. सकाळीच ते कामाला निघून गेल्यानंतर कुंदन घराशेजारील मित्रांसोबत रस्त्यावर खेळत होता. सावरकर ले आऊट रिकाम्या प्लॉटसमोरील विद्युत खांबाजवळून जात असताना त्याला खाली लोंबकळलेल्या विजेच्या तारांचा जबर धक्का बसला. एका शेजाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने तेथे धाव घेतली. त्याला काठीच्या मदतीने खांबापासून वेगळे केले. मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून कळमना ठाण्याचे पोलीस अधिकारी रतन उंबरकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.