नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘ स्वर्गातील नर्क’ या पुस्तकाचे नाव बदलून ते ‘नरकातील राऊत’ असे ठेवण्यात यावे. त्या पुस्तकात स्वत:चे राजकीय अधिपतन कसे झाले याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. नैतिक दिवळखोरीची ही कथा असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन करण्याचे काम केले आहे. त्यांनी पुस्तकातून आपले कपडे वाचवण्याचा काम केले आहे.’नरकातला राऊत’ असे पुस्तकाचं नाव ठेवले पाहिजे. या बाबत संजय राऊत यांना पत्रही पाठवणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.भाजप-सेना युती ही सर्वोत्तम होती, या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचे काम केले होते मात्र संजय राऊत सारख्याच व्यक्तीने शिवसेनेला संपवले आहे. हिंदुत्व विचारापासून फारकत घेत काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याच काम त्यांनी केले आहे.
गोधरा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितजी शाह यांना क्लीन चिट दिली. मात्र संजय राऊत यांनी लिहिले आहे की त्यांनी मध्यस्थी केली. २०१० मध्ये अमित शाह यांना अटक केली हे सर्वाना माहीत आहे. न्यायलयाने त्यांना निर्दोष सोडले आहे. महाविकास आघाडी आता फुटत आहे त्यामुळेच हे पुस्तक आले असाही आरोप बावनकुळे यांनी केला.२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मोठ्या भावा प्रमाणे उद्धव ठाकरे यांना सन्मान दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नात जोडून ठेवले होते. खरे तर मानसिक दिवाळखोरीचे उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे. पुस्तकात न्यायलयाच्या विरोधात असलेले कंटेंटचा तपास केला पाहिजे. पुस्तकात आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम केले आहे. पुस्तकात देशाच्या न्याय व्यवस्थेला बदनाम करण्याचे काम केले आहे. त्यामुळे या पुस्तकाची चौकशी झाली पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.
चिदंबरम हे कॉंग्रेसचे मोठे नेते आहे. एखाद्या गावातच लहान कार्यकर्त्यांला विचारले तर तो कॉंग्रेस सोबत राहायला तयार नाही.कॉंग्रेस हा आता दिशाहीन पक्ष झाला आहे. राहून गांधी यांना व्हिजन नाही. कॉंग्रेसचा आता बट्ट्याबोळ होणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीबाबत मदत पुनर्वसन मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.नवीन वाळू धोरण आले असून नवीन टेंडर जिल्हाधिकारी काढतील, वाळू टंचाई दूर करतील. राज्यातील ३० लाख घरकुलाचे काम सुरू आहे. रेतीची रॉयल्टी घरपोच देणार आहे. यात घरकुलसाठी ओरड संपणार आहे, तहसीलदार वाळू उपलब्ध करून देतील.
शेतकरी मागण्या करतात, पांदन रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तांच्या पैसे टाकावे लागायचे, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे की शेतीसाठीचे पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस बंदोबस्तासाठी पैसे घेण्यात येणार नाही.नवीन नागपूरची गरज निर्माण झाली आहे, लोकांना स्वस्तात घर मिळावे आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा मिळायला पाहिजे. एक चांगला आराखडा आम्ही तयार केला आहे आणि एक नवे नागपूर या मधून तयार होणार असेही बावनकुळे म्हणाले.