नागपूर : कुही वनक्षेत्रात एक, दोन नाही तर तब्बल ५२५ पक्ष्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच शिकाऱ्यांना नागपूर वनखात्याने अटक केली. वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कुही वनक्षेत्रातील वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना खोबना वनक्षेत्राअंतर्गत मौजा अंबाडी सावळी येथील शेतशिवरात काही अज्ञात इसम पक्ष्यांची शिकार करण्यासाठी आले आहे, अशी माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांनी सापळा रचून क्रिष्णा चाचेरकर, शेकर चाचेरकर, रवी चाचेरकर, सुनील चाचेरकर व आकाश चाचेरकर या कामठी येथील शिकाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून नायलॉन जाळे, नायलॉन दोरी व त्यांनी शिकार केलेले ५२५ पक्षी हस्तगत करण्यात आले.

supriya sule ajit pawar latest news
“दमदाटी करणाऱ्यांना विनम्रपणे सांगायचंय की…”, सुप्रिया सुळेंचा टोला; अजित पवारांना प्रत्युत्तर!
dr Narendra Dabholkar murder case marathi news
डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा; विशेष न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना सुनावले
Dombivali Police Caught two thieves
डोंबिवलीत घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक
What Sunil Shelke Said?
सुनील शेळकेंचं रोहित पवारांना उत्तर, “खंडोबाच्या पायथ्याशी मटणाच्या गाड्या रिकाम्या करणाऱ्यांनी आम्हाला..”
Renuka Shahane Post Viral
निवडणुकीच्या धुरळ्यात रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत, “मराठी Not Welcome म्हणणाऱ्यांना, घरं नाकारणाऱ्यांना..”
Nagpur, Shop, owner cheated,
नागपूर : पती-पत्नीला दुकान सांभाळायला दिले, पण रोज जमा होणाऱ्या पैशांमुळे…
google lay off
Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’

हेही वाचा – ‘एसटी’त अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांशी लाभाबाबत भेदभाव, महामंडळाच्या आदेशाला केराची टोपली

हेही वाचा – सहाय्यक पोलीस निरीक्षक शृंगी घुबडाच्या प्रेमात

ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा व सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पी.डी. बाभळे, क्षेत्र सहाय्यक एस.यू. चव्हाण, आर.डब्ल्यू. पिल्लेवार, वनरक्षक जी.एस. सहारे, पी.बी. दहीकर, पी.एम. चोपडे, पी.जी. गराडे, वनमजूर कैलास तितरमारे, सुरेश तिरमारे, कृष्णा शहारे, राजू मोंडे, ब्रम्हा आस्वले, वासुदेव ठाकरे यांनी केली.