नागपूर: सनासुदीत सोन्याच्या दरात चढ- उताराचा क्रम कायम आहे. बघता- बघता मध्यंतरी सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. परंतु १६ ऑगस्टला दर घसरून १ लाखाहून खाली आले होते. त्यानंतर पून्हा दर एक लाखावर गेले. परंतु एकच दिवसात पून्हा दरात घसरण होऊन सोन्याचे दर मागील काही आठवड्यातील निच्चांकीवर आले आहे. मंगळवारी (१० ऑगस्ट २०२५) सोन्याचे दर काय होते? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर नेल्याने भारतातील सराफा व्यवसाय अडचणीत येण्याचा धोका ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) वर्तवला होता. त्यानंतर सोन्याचे दरात मोठी वाढ होऊन ते विक्रमी उंचीवरही गेले होते. परंतु आता अमेरिकेने वाढवलेल्या कराचा प्रभाव सोन्याच्या दरावर होत नसल्याचे चित्र आहे. नागपुरातील सराफा बाजारात १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ लाख २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७८ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ९०० रुपये नोंदवले गेले.

दरम्यान नागपुरात जन्माष्टमीच्या काळात १६ ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दर घसरून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९९ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७७ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर दुसऱ्या दिवशी पून्हा २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम एक लाखाहून वर गेले होते. परंतु दोनच दिवसांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दर घसरून आणखी खाली आले आहे. नागपुरात १९ ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दर घसरून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७७ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झालेली दिसत आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात १४ ऑगस्टला सकाळी चांदीचे दर प्रति किलो १ लाख १६ हजार १०० रुपये होते. हे दर १६ ऑगस्टला प्रति किलो १ लाख १५ हजार १०० रुपयांवर गेले. तर १९ ऑगस्ट २०२५ रोजी प्रति किलो दर १ लाख १४ हजार ३०० रुपये नोंदवले गेले.