scorecardresearch

नागपूर : रूग्णाच्या मृत्यूमुळे किमया रुग्णालयात तोडफोड, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

१५ दिवसांपासून उपचार सुरू होते, रूग्ण डायलेसिसवर होता

नागपूर : रूग्णाच्या मृत्यूमुळे किमया रुग्णालयात तोडफोड, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

नागपूर मधील सेंट्रल एव्हेन्यूवरील किमया रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

याबाबत रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अधिक बोलणे टाळले. परंतु एकाने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, रुग्णावर योग्य उपचार झाले. तोडफोड करणाऱ्यांविरोधात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ दिवसांपूर्वी या रुग्णाला किमया रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्ण डायलेसिसवर होता. दरम्यान, काल (शुक्रवार) संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शाहरूख नावाच्या व्यक्तीसह इतर काही लोकानी रुग्णालयात तोडफोड करत, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.

या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी भारत क्षीरसागर यांनी, रुग्णालयाचे व्यवस्थापक तक्रार करण्यासाठी आल्याचे सांगितले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या