नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
राज्य शासनाने नागपूर-मुंबई या ७१० किलोमीटर द्रुतगती महामार्ग बांधणीच्या(समृद्धी महामार्ग) ४६ हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले असून ते पुढील तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.केवळ रस्ते बांधणीतून शहरे जोडणे आणि दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणे हाच ऐकमेव हेतू या प्रकल्पबांधणीच्या मागे नसून यामाध्यमातून संपूर्ण राज्य समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत सह्य़ाद्रीवर आयोजित संपादकांशी चर्चे दरम्यान फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. अमंलबजावणीसाठी सुरु असलेल्या प्रगतीचा तपशीलही सांगितला. हा प्रकल्प देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. काम पूर्ण झाल्यावर केवळ सात तासात नागपूर-मुंबई हे अंतर कापणे शक्य होईल. महामार्गाच्या बाजूला कृषी प्रक्रिया उद्योग, आय.टी,गृहबांधणी आणि इतरही पुरक उद्योगांची उभारणी केली जाणार असून त्यातून हजारो कोटींची गुंतवणूक राज्यात अपेक्षित आहे. राज्यात ४५ टक्के लोकसंेख्या शेतीवर आधारित आहे, या महामार्गाचा त्यांना सर्वात जास्त फायदा होणार असून त्यांचा शेतमाल मुंबईला विक्रीसाठी नेणे सहज शक्य होणार आहे. प्रक्रिया उद्योगामुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्याची ही संधी आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समृद्ध करणारा हा महामार्ग असेल. काम पूर्ण झाल्यावर पुढच्या काही वर्षांत राज्य विकासाच्या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना मागे टाकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पात अनेक बाबी प्रथमच हाती घेण्यात येणार आहेत. भूसंपादना ऐवजी भू-संचयनाचा पर्याय शेतकऱ्यांना देण्यात आला असून यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह प्रकल्पात भागीदार म्हणूनही सहभागी होता येणार आहे. हा महामार्ग अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त राहणार आहे. तो दहा जिल्ह्य़ांमधून जाणार असून २४ जिल्हांना जोडणार आहे.१० जिल्हे ३० तालुके आणि ३५४ गावांमधून तो जाणार आहे. महामार्गा दरम्यान ५० उड्डाण पुल, पादचारी, बैलबांडय़ांसाठी ३०० वर भुयारी मार्ग असणार आहे. राज्यातील विविध औद्योगिंक क्षेत्र, एमआयडीसीशी तो जोडला जाणार असल्याने एक प्रकारे उद्योग क्षेत्रातालही याचा लाभ होणार आहे.
रस्त्यालगत उभारण्यात येणारे कृषी समृद्धी केंद्र हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा आहे. सुमारे एक हजार एकरात नवीन शहर वसविण्यात येणार असून त्यात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे उद्योग कारखाने, हॉटेल्स, पेट्रोल पंम्प, मनोरंजन मॉल्ल या ठिकाणी रोजगाराची संधी मिळणार आहे. नवीन कौशल्य शिकण्याची तसेच स्वताचा उद्योग उभारणीचा पर्यायही यामुळे उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्दिष्टय़े
- -ग्रामीण भागात उद्योग उभारणी
- -स्थलांतर रोखणे,
- -भूसंपादन नव्हे भूसंचयन
- -शास्वत विकासाची हमी
- -शेतकऱ्यांची भागीदारी
- या दहा जिल्ह्य़ांमधून जाणार
- -नागपूर-वर्धा,-अमरावती-वाशीम- बुलढाणा- औरंगाबाद- जालना- अहमदनगर-नासिक, ठाणे</li>
- या जिल्ह्य़ांना जोडणार
- -चंद्रपूर-गोंदिया-भंडारा-गडचिरोली-य़वतमाळ-अकोला, हिंगोली-परभणी-नांदेड-बीड-धुळे-जळगाव-पालघर-रायगड
अंमलबजावणीचे टप्पे
- -एकूण खर्च ४६ हजार कोटी
- -आखणीचा अंतिम टप्पा-सप्टेबर २०१६
- -कामाची सुरुवात -एप्रिल २०१७
- -काम पूर्ण करणे-मार्च २०२०
- सध्याची स्थिती
- -अधिसूचना ७ सप्टेबरला जारी
- -वाहतुकीशी संबंधित सर्वेक्षण पूर्ण
- -कृषी समृद्धी केंद्राच्या जागा निश्चित
- -४४० हे. वनजमीन संपादनाचा प्रस्ताव सादर
आवश्यक जमीन
- -महामार्गासाठी-८५२० हे.
- -रस्त्यालगत सुविधांसाठी -१,५०० हे.
- -कृषी समृद्धी केंद्र -१०,८०० हे.
- एकूण लागणारी जमीन-२०,८२० हे.
- वनजमीन-३९९हे. (१.९२ हे)
- शेत जमीन-१७,४९९ हे. (८४,१३ टक्के)
- पडिक जमीन-२९२२ हे. (१३.९५ टक्के)
ठळक वैशिष्टय़े
- -आशिया खंडातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग
- -नैसर्गिक आपत्ती व युद्धसदृश्य स्थितीत विमान उतरविण्यासाठी तीन धोवपट्टय़ा
- -प्रती तास १५० किमी.ने धावणार वाहने
- -सीसीटीव्ही, संपूर्म मार्ग वायफाय
- -अडथळा विरहित वाहतूक, पथकर नाके, पोर्चमार्गावर
- -ओएफसी केबल्स, सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र मार्गिका
- -महामार्गालगतचे जिल्हे समृद्धी महामार्गाशी ४/६ पदरी रस्त्यांनी जोडणार
- -वर्धा, जालना येथील ड्राय पोर्ट,जेएॠपीटीशी जोडणार
- -रस्त्यासाठी स्थानिक बांधकाम सामुग्री, प्लॅस्टिक, फ्लाय अॅशचा वापर
कृषी समृद्धी केंद्र
- -१ हजार एकरमध्ये नवनगर
- -२० ते २५ हजार लोकांना रोजगार
- -आवश्यक त्या सर्व आधुनिक सेवा
- -शेतकऱ्यांसाठी गोदामे, माती परीक्षण, फळ पक्रिया, गुरांचे दवाखाने, शीतगृहांची व्यवस्था